Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट! सासू, सासू, दिरासह तिघांना दिलासा
गुन्हा

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट! सासू, सासू, दिरासह तिघांना दिलासा

Vaishnavi Hagawane Case
2
  • वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सासू, दीर आणि कौटुंबिक मित्राला हायकोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर.

  • मुंबई उच्च न्यायालयाने तिघांना जामीन देताना काही अटी घातल्या आहेत.

  • या निर्णयानंतर प्रकरणातील पुढील न्यायालयीन घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील सासू लता हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कौटुंबिक मित्र निलेश चव्हाण या तिघांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मंजूर होणे म्हणजे निर्दोष मुक्तता नसून खटल्यातील आरोपांचा अंतिम निर्णय सुनावणीदरम्यान होणार आहे.

पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने मे २०२५ मध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. वैष्णवीचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. (Vaishnavi Hagawane Death Case) या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी लता हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्या स्वतंत्र भूमिका आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून त्यांना सशर्त जामीन मंजूर केला.

न्यायालयाने काय निरीक्षण नोंदवले?

सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रत्येक आरोपीची भूमिका स्वतंत्रपणे तपासली. तपास पूर्ण झालेला असल्याने आणि पुढील कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.  (Bombay High Court Bail) मात्र, या प्रकरणातील आरोप गंभीर असून त्यांचा अंतिम निर्णय खटल्याच्या सुनावणीतच होणार आहे. जामीन मंजूर झाल्याने आरोपी निर्दोष ठरत नाहीत, ही बाबही महत्त्वाची आहे.

नेमके काय आहे वैष्णवी हगवणे प्रकरण?

वैष्णवी हगवणेचा १६ मे २०२५ रोजी पुण्यातील भुकूम परिसरातील सासरच्या घरी मृत्यू झाला होता. ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. तिच्या मृत्यूनंतर वडील अनिल कास्पटे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हुंड्याच्या मागणीवरून वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. (Vaishanvi Hagwane)

या प्रकरणात पती शशांक हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कौटुंबिक मित्र निलेश चव्हाण यांच्यासह अन्य संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासानंतर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून खटल्याची सुनावणी सुरू आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. (Case Hearing)

हेही वाचा : Pune Crime : ७ लाखांच्या कर्जाच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण; कोथरूड ते नवी मुंबई थरारक पाठलाग, पोलिसांकडून सुटका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts