Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • Kini Toll Plaza Protest Release : ऊसदराच्या आंदोलनाला अखेर यश! राजू शेट्टींची मोठी घोषणा; 63 तासांनंतर पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला
ऍग्रो स्पेशल

Kini Toll Plaza Protest Release : ऊसदराच्या आंदोलनाला अखेर यश! राजू शेट्टींची मोठी घोषणा; 63 तासांनंतर पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला

Kini Toll Plaza Protest Release
10
  • ऊसदर आंदोलनाबाबत राजू शेट्टी यांनी यशस्वी तोडगा निघाल्याची घोषणा केली.

  • तब्बल ६१ तासांनंतर पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.

  • आंदोलनामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Kini Toll Plaza Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनावर अखेर तोडगा निघाला आहे. ऊसाला प्रतिटन ४,२०० रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर ६१ तासांपासून सुरू असलेले चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे किणी टोलनाक्यासह पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली असून दिवाळीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोलनाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे आंदोलन सुरू केले होते. ऊसाला योग्य दर मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला होता. यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. (Raju Shetty)

मात्र, गुरुवारी रात्री कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ऊसाला एकूण प्रतिटन ४,२०० रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. या निर्णयानंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली.

ऊसाला ४,२०० रुपये कसे मिळणार? (Sugarcane Protest)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण ४,२०० रुपये प्रतिटन देण्याचे ठरले असून ही रक्कम तीन टप्प्यांत मिळणार आहे.

  • पहिला टप्पा: ३,९०० रुपये प्रतिटन पहिली उचल.
  • दुसरा टप्पा: गळीत हंगाम संपल्यानंतर १०० रुपये प्रतिटन.
  • तिसरा टप्पा: पुढील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी २०० रुपये प्रतिटन.

अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण ४,२०० रुपये प्रतिटन मिळणार आहेत. मात्र, एकरकमी रक्कम मिळावी अशी संघटनेची अपेक्षा होती. तीन टप्प्यांत पैसे देण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला असला तरी या पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याचेही समोर आले आहे.जर या दोन टप्प्या दरम्यान किंवा नतर साखरेच्या भावात वाढ झाली तर प्रतिटन 100 रुपये प्रमाणे वेगळा भाव देण्याची मागणी मान्य करण्यात आली. (Sugarcane Rate Protest)

पुणे-मुंबई ते कोल्हापूर-सांगली प्रवाशांना दिलासा

ऐन दिवाळीच्या काळात आंदोलन सुरू असल्याने पुणे-मुंबईहून कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. साधारण पाच तासांचा प्रवास सात ते आठ तासांपर्यंत लांबत होता. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एसटी बसच्या अनेक फेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या. ( Pune Bangalore Highway Reopens)

आता ऊसदरावर तोडगा निघाल्यानंतर किणी टोलनाक्यावरील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. महामार्गावरील अडथळे हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोल्हापुरातील ऊसदराचा हा तोडगा सांगली आणि सातारा जिल्ह्यांतही लागू करण्याबाबत चर्चा झाली आहे. तेथील प्रश्नावर संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे. (Pune Bangalore Highway)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts