Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Diwali Food Safety : दिवाळीच्या खरेदीत सावधान! दूध, मिठाई आणि फरसाण खरेदी करताना ‘हे’ नियम पाळा; तुकाराम मुंढेंचे आवाहन
फूड

Diwali Food Safety : दिवाळीच्या खरेदीत सावधान! दूध, मिठाई आणि फरसाण खरेदी करताना ‘हे’ नियम पाळा; तुकाराम मुंढेंचे आवाहन

Diwali Food Safety
2
Diwali Food Safety : दिवाळीच्या सणात मिठाई, दूध, फरसाण आणि खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते.सणाच्या काळात भेसळ आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांमुळे आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये.

अन्नसुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी आणि विक्रेत्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत तुकाराम मुंढे यांनी मार्गदर्शन केले आहे.

सुटे दूध खरेदी टाळा; मिठाई ताजीच घ्या

दिवाळीच्या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी ग्राहकांनी सुटे दूध खरेदी करणे टाळावे, असे सूचित करण्यात आले आहे. पॅकबंद आणि योग्य माहिती असलेले दूध खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.

मिठाई खरेदी करतानाही विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो ताजी मिठाई खरेदी करावी आणि खरेदी केलेली मिठाई एक ते दोन दिवसांत संपवावी. एक-दोन दिवसांपूर्वी तयार केलेली मिठाई खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. (Milk)

स्वस्त खाद्यतेलाच्या मोहात पडू नका

दिवाळीत फराळ तयार करण्यासाठी खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कमी किमतीचे तेल खरेदी करून पैसे वाचवण्यापेक्षा खाद्यपदार्थांमध्ये तेलाचा वापर मर्यादित ठेवावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

तळणीसाठी वापरलेले तेल वारंवार पुन्हा वापरणे टाळावे. एकाच तेलाचा अनेक वेळा वापर केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दुकानदारांनीही तळणीच्या तेलाबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी. (Edible Oil)

हेही वाचा : Tukaram Mundhe FDA Action : दिवाळीच्या फराळावर FDA ची नजर; १,०५७ आस्थापनांची तपासणी, परवाने निलंबित केल्याची माहिती

रंगीत मिठाई आणि फरसाण खरेदी करताना काळजी घ्या

दिवाळीच्या बाजारात विविध रंगांची मिठाई आणि आकर्षक दिसणारे खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, कृत्रिम रंग किंवा भेसळयुक्त घटक असण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्राहकांनी असे पदार्थ खरेदी करताना सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

फरसाण आणि नमकीनचे विविध प्रकार दिवाळीत मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. मात्र, उघड्यावर ठेवलेले, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले किंवा योग्य माहिती नसलेले पदार्थ खरेदी करणे टाळावे. (artificial colour Sweet)

दुकानदारांनीही नियमांचे पालन करावे

अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी केवळ ग्राहकांची नाही, तर दुकानदारांचीही आहे. मिठाई आणि फरसाण तयार करताना स्वच्छता राखणे, दर्जेदार कच्चा माल वापरणे, खाद्यतेलाचा पुनर्वापर टाळणे आणि पदार्थ योग्य पद्धतीने साठवणे आवश्यक आहे.

दिवाळीच्या आनंदात आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी ग्राहकांनी खरेदी करताना जागरूक राहावे आणि दुकानदारांनी अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Store Rules)

हेही वाचा :  FDA Action : मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध? सुट्या मसाल्यांची विक्री बंद होणार; ग्राहकांसह विक्रेत्यांनीही घ्या काळजी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts