दिल्ली-NCR मधील अनेक भागांत AQI ४०० पार गेल्याने प्रदूषणाची पातळी गंभीर झाली आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी CAQM कडून परिस्थितीवर देखरेख आणि कारवाई सुरू आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनविषयक त्रासाचा धोका असून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
Delhi Air Pollution : दिवाळीपूर्वीच दिल्ली-NCR मधील हवेची गुणवत्ता खालावली असून अनेक भागांमध्ये प्रदूषणाची पातळी गंभीर झाली आहे. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता दिल्लीचा AQI ३८९ असल्याची नोंदही उपलब्ध आहे. GRAP-II लागू असल्याची माहितीवाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर CAQM ने देखरेख आणि प्रदूषणविरोधी कारवाई तीव्र केली आहे. (Delhi NCR AQI)
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, . ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता दिल्लीचा AQI ३८९ असल्याची नोंदही उपलब्ध आहे. GRAP-II लागू असल्याची माहिती. हा स्तर गंभीर श्रेणीत येतो. पंजाबी बाग, नरेला, रोहिणी आणि आर. के. पुरम यांसारख्या भागांमध्येही प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. (Delhi AQI 350)
CAQM कडून देखरेख वाढवली
वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी हवेची गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने (CAQM) देखरेख आणि अंमलबजावणी वाढवली आहे. पंजाबमधील शेतातील पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासह संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना कारवाईबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिल्ली-NCR मध्ये यापूर्वीच GRAP चा दुसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी यांत्रिक साफसफाई, पाण्याची फवारणी, बांधकामस्थळांची तपासणी आणि वाहनांमधून होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यावर भर दिला जात आहे. (CAQM Action)
हेही वाचा : Mumbai Air Pollution : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
प्रदूषण वाढण्यामागे कोणती कारणे?
दिल्लीतील प्रदूषण वाढण्यामागे अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
- शेजारील राज्यांमध्ये पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटना.
- वाहनांमधून होणारे उत्सर्जन.
- बांधकाम आणि रस्त्यांवरील धूळ.
- औद्योगिक आणि निवासी भागांतील प्रदूषण.
- कमी वाऱ्याचा वेग आणि प्रतिकूल हवामानामुळे प्रदूषक हवेत साचणे.
नागरिकांच्या आरोग्याची चिंता
हवेतील प्रदूषण वाढल्याने श्वसनाचा त्रास, खोकला, डोळ्यांची जळजळ आणि दम्याचा त्रास असलेल्या नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी CAQM आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील काळात कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे.(Air Quality Index)
हेही वाचा : Pune Air Pollution : पुण्याच्या हवेत प्रदूषणाचा विळखा! AQI वाढला; नेमकी कारणं काय?









