Pune Budhwar Peth FDA Raid: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. संशयित खवा आणि पनीरच्या कंटेनरमधून नमुने घेण्यात आले आहेत.
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) मोठी कारवाई सुरू (Pune Budhwar Peth FDA raid ) करण्यात आली आहे. संशयित खवा आणि पनीर घेऊन आलेल्या दोन ते चार कंटेनरमधून अधिकाऱ्यांकडून नमुने गोळा (khava samples Pune) करण्यात येत आहेत. हे कंटेनर परराज्यातून पुण्यात दाखल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा: गणेशभक्तांसाठी Good News! मुंबई–कोल्हापूर मार्गावर ४ विशेष रेल्वे; पाहा संपूर्ण वेळापत्रक
बुधवार पेठ परिसरातून (Pune Budhwar Peth FDA raid ) पुणे शहरात मोठ्या प्रमाणात खवा आणि पनीरचे वितरण केले जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे या कारवाईकडे लक्ष लागले आहे. गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधित खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे.
तपासणी अहवालानंतर प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.









