Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींना थेट इशारा! ‘तुमच्या मुलांना खायला द्या
गुन्हा

तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींना थेट इशारा! ‘तुमच्या मुलांना खायला द्या

Tukaram Mundhe Celebrities
21

Tukaram Mundhe Celebrities : FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी गेल्या काही दिवसांपासून आपला मोर्चा सेलिब्रिटींकडे वळल्याचा पाहायला मिळत आहे…शाहरूख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ हे अभिनेता पान मसाला, गुटखा, तंबाखू यांची जाहिरात करताना दिसतात…यामुळे त्यांना फॉलो करणारे तरूण या आमलीपदार्थांकडे वळतात…त्यांना याची सवय लागते, यामुळे आता तुकाराम मुंढेंनी आपला मोर्चा सेलिब्रिटींकडे वळवत थेट कारवाई करण्याचा इशारा दिलाय…

तुम्ही ज्या पदार्थांची जाहीरात करताय ते तुमच्या मुलांना खायला द्या…जर तुम्हालाही माहिती आहे की ते योग्य नाही, तर मग जाहीरात का करता, असा सवाल तुकाराम मुंढेंनी केलाय…त्यांनी थेट कारवाईचा इशाराही दिलाय…त्यामुळे पाहूयात की तुकाराम मुंढे सेलिब्रिटींकडे का वळले आहेत? तुमच्या मुलाला आधी खायला द्या, असं तुकाराम मुंढे का म्हणाले? सेलिब्रिटींमुळे तुकाराम मुंढेंची बदली होणार का?

शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला FDAची नोटीस का?

तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून कारवाईवर कारवाई करताना दिसत आहे…त्यांनी थेट भेसळयुक्त दूध, पनीरावर धडक कारवाई केली, यामुळे राज्यात पनीरची कमतरता पाहायला मिळाली…त्यानंतर त्यांनी हॉटेलकडे आपला मोर्चा वळवला आणि आता हॉटेलमध्ये साफसफाई, योग्य पदार्थ पाहायला मिळत आहे…त्यांनी प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर थेट मकोका लावला आहे…मात्र आता त्यांनी गुटखा विक्रीसाठी अप्रत्यक्ष मदत करणारे म्हणजेच जाहिरात करणारे सेलिब्रिटी यांना थेट कारवाई करण्याचा इशारा दिलाय…

तंबाखू, पान-मसाला आणि गुटखा यांसारख्या आरोग्याला कमालीच्या घातक असलेल्या पदार्थांशी साधर्म्य असणाऱ्या इलायची ब्रँड्सची जाहिरात केल्याप्रकरणी एफडीएने थेट बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती… ‘सरोगेट ॲडव्हर्टायझिंग’ म्हणजेच अप्रत्यक्षपणे अंमली किंवा आरोग्याला अपायकारक असलेल्या पदार्थांची प्रसिद्धी केल्याचा गंभीर ठपका या तिन्ही स्टार्सवर ठेवण्यात आला होता…कायद्याचे उल्लंघन सिद्ध झाल्यास, दिलेल्या मुदतीत समाधानकारक उत्तर न आल्यास या बड्या कलाकारांवर कठोर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार असणार आहे…त्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे…

जर तुम्ही पान, गुटख्याची जाहिरात करत असाल, तर आधी तुम्ही स्वतः त्याचे सेवन केले पाहिजे… तुमच्या स्वतःच्या मुलांना त्याचे सेवन करू द्या, त्यांना त्याची सवय लावून द्या आणि मगच देशातील इतर लोकांना ते खायला सांगा,” अशा शब्दांत तुकाराम मुंढेंनी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ या अभिनेत्यांना सुनावले आहे…
FDAने यापूर्वीच या तिन्ही बड्या अभिनेत्यांना अधिकृतपणे कारणे दाखवा नोटीस बजावत नोटिशीच्या माध्यमातून त्यांना अशा प्रकारच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या उत्पादनांशी साधर्म्य असणाऱ्या ब्रँड्सची प्रसिद्धी तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले आहेत… एवढेच नव्हे तर त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरून या जाहिरातींशी संबंधित असलेली सर्व प्रकारची प्रचारात्मक सामग्री आणि व्हिडिओ त्वरित हटवण्याचे कडक आदेशही प्रशासनाने दिले आहेत. या कारवाईनंतर मनोरंजन विश्वात आणि जाहिरात क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असतानाच, तुकाराम मुंढेंनी घेतलेल्या जाहीर भूमिकेमुळे या कलाकारांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे…

हेही वाचा : ९% विद्यार्थ्यांना आत्महत्येचे विचार! अभ्यास, करिअर की मानसिक तणाव?

तुकाराम मुंढेंनी सेलिब्रिटींच्या जबाबदारीबाबत काय सांगितलं? ( Tukaram Mundhe Celebrities )

जर एखादा मोठा कलाकार जाहीर पडद्यावर येऊन कोट्यवधी जनतेला एखादे उत्पादन चांगले आहे असे सांगत असेल, तर तोच नियम त्या उत्पादनाचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाही लागू झाला पाहिजे, असे तुकाराम मुंढेंनी म्हणाले…या संपूर्ण प्रकरणात बॉलिवूड वर्तुळातून आणि कायदेशीर बाजूने असा बचाव केला जातो की, अभिनेता हा संपूर्ण मोहिमेचा केवळ एक व्यावसायिक चेहरा असतो आणि उत्पादनाच्या गुणवत्तेची, परिणामांची सर्व जबाबदारी उत्पादक, निर्मात्या कंपनीची असते… मात्र, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा व्यावसायिक युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला आहे… “मी एक व्यावसायिक व्यक्ती आहे, मी अभिनेता, अभिनेत्री आहे, इन्फ्युअन्सर्स आहे, खूप मोठी व्यक्ती आहे, म्हणून मी केवळ जाहिरात करत आहे आणि ही माझी जबाबदारी नाही… ती फक्त उत्पादकाची जबाबदारी आहे, असे अजिबात चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी सेलिब्रिटींना सुनावले आहे… सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित व्यक्ती केवळ व्यवसाय म्हणून या सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाहीत, असा पुनरुच्चारही त्यांनी केला…

टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवर “यात केशर आहे” असे सांगून कोट्यवधी तरुणांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर त्यांनी संताप व्यक्त केलाय… जाहिरात करणं म्हणजे केवळ पैशांसाठी उत्पादनाला आपला चेहरा देणं नव्हे, तर आपण जनतेला काय सेवन करायला सांगत आहोत आणि कशावर विश्वास ठेवायला लावत आहोत याची नैतिक जबाबदारी कलाकारांवर असते, असेही मुंढे म्हणाले… जर कलाकारांना खरोखरच वाटत असेल की या उत्पादनात केशर आहे आणि ते आरोग्यासाठी सुरक्षित आहे, तर त्यांनी सर्वात आधी त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून आणि स्वतःच्या कुटुंबापासून करून दाखवावी, असे म्हणत तुकाराम मुंढेंनी बॉलिवूडला सुनावलं आहे…

पुढे FDAकडून कोणती प्रक्रिया होऊ शकते? ( Tukaram Mundhe FDA )Shah Rukh Khan

महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असताना, इलायची, माउथ फ्रेशनरच्या नावाखाली मुख्य ब्रँडची छुपी प्रसिद्धी करणे हा कायद्याचा अवमान आहे, यावर तुकाराम मुंढे ठाम आहेत… तुकाराम मुंढे यांच्या या बेधडक आणि कोणाचीही गय न करणाऱ्या भूमिकेमुळे आता या बड्या कलाकारांना एफडीएच्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देणे भाग पडणार आहे… दिलेल्या मुदतीत जाहिराती हटवल्या नाहीत, समाधानकारक उत्तर आले नाही, तर कायद्यासमोर सगळे समान आहेत या तत्त्वानुसार अन्न व औषध प्रशासन पुढील कठोर कायदेशीर पावले उचलण्याच्या तयारीत आहे…तुकाराम मुंढेंनी सेलिब्रिटींविरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts