Student Mental Health : महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील आयुष्य म्हणजे शिक्षण, करिअर आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्नं… पण देशभरातील विद्यार्थ्यांचं वास्तव काहीसं वेगळंच असल्याचं समोर आलंय…सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय कृती दलाच्या देशव्यापी सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे…पाहुयात LS मराठीचा यावरील स्पेशल रिपोर्ट!…
महाविद्यालय…विद्यापीठ…हातात पुस्तकं… डोळ्यांसमोर करिअरची स्वप्नं… आणि भविष्यासाठीची धडपड…पण या स्वप्नांच्या मागे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात सुरू आहे एक वेगळीच झुंज…सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सच्या सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचं चिंताजनक चित्र समोर आलंय.
24.3 लाख+ विद्यार्थ्यांचे प्रतिसाद
9% — वारंवार/अनेकदा आत्महत्येचे विचार
15% — दीर्घकाळ तणाव, चिंता किंवा दुःख
34% — कॅम्पसमध्ये ‘बाहेरचे’ असल्याची भावना
सर्वेक्षणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे आत्महत्येच्या विचारांची आकडेवारी…
जवळपास ९ टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात वारंवार किंवा अनेकदा आत्महत्येचे विचार आल्याचं सांगितलंय…तर १५ टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यांत अनेक आठवडे तीव्र मानसिक त्रास, तणाव, दुःख किंवा चिंतेचा अनुभव घेतल्याचं सांगितलंय…
हेही वाचा : बापाचा मृतदेह 4 वर्षे फ्रीझरमध्ये! ‘पुन्हा जिवंत होतील’ या आशेने मुलांनी काय केलं?
२.४३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून काय समोर आलं?
अभ्यासाचा ताण करिअर चिंता आणि नोकरीची अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणार मानसिक संघर्ष…२४ लाख ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रतिसादांवर आधारित या सर्वेक्षणात जवळपास ९ टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात वारंवार किंवा अनेकदा आत्महत्येचे विचार आल्याचं सांगितलं आहे…तर तब्बल १५ टक्के विद्यार्थ्यांनी गेल्या सहा महिन्यांत अनेक आठवडे तणाव, चिंता, दुःख किंवा तीव्र मानसिक त्रासाचा सामना केल्याचं सांगितलंय… इतकंच नाही तर ३४ टक्के विद्यार्थ्यांना आपल्या कॅम्पसमध्ये आपण ‘बाहेरचे’ असल्याची भावना जाणवते…अशी आकडेवारी समोर आली आहे.
अभ्यासाचा वाढता ताण, करिअर आणि नोकरीची चिंता, प्लेसमेंटमधील अडचणी, कडक उपस्थितीचे नियम, अतिरिक्त कामाचा भार आणि संस्थात्मक पातळीवरील समस्या… या सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचं या सर्वेक्षणातून दिसतंय…
३२% संस्थांमध्ये समुपदेशनाची सुविधा नसल्याचा दावा ( Student Mental Health )
विशेष म्हणजे, ३२ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्थेत समुपदेशनाची सुविधा उपलब्ध नसल्याचं सांगितलं आहे…मात्र, हे आकडे अंतिम चित्र मानता येणार नाही… कारण कृती दलानेच स्पष्ट केलं आहे की सध्याचा नमुना संपूर्ण विद्यार्थी समुदायाचं प्रतिनिधित्व करत नाही आणि सर्वेक्षणाचं विश्लेषण अद्याप सुरू आहे… विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या मानसिक आरोग्याकडे पाहण्याची वेळ आता आली आहे….
अभ्यासाचा ताण, करिअरची चिंता आणि स्पर्धेची धावपळ… या सगळ्याच्या ओझ्याखाली विद्यार्थी दबला जात असेल, तर केवळ ‘अभ्यास कर’ असं सांगून प्रश्न सुटणार नाही… २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून समोर आलेले हे आकडे इशारा देणारे आहेत… त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या मनाकडे पाहण्याची, त्यांच्या अडचणी ऐकून घेण्याची आणि गरजेच्या वेळी त्यांना आधार देण्याची जबाबदारी आता शिक्षण संस्थांसह संपूर्ण व्यवस्थेची आहे… कारण… एक विद्यार्थी गमावल्यानंतर मानसिक आरोग्याची चर्चा करण्यापेक्षा, त्याआधी त्याचा हात धरलेला कधीही चांगलं!









