Breaking News :
  • Home
  • Top News
  • महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्ताला अटक
गुन्हा

महापालिकेतील नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्ताला अटक

Pune PMC Job Scam
33

प्रतिनिधी | जिवन सोनवणे 

Pune PMC Job Scam : पुणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुण-तरुणींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने खेडेकर याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देतो, असे सांगून खेडेकर याने अनेक तरुण-तरुणींना आमिष दाखवले. नोकरी मिळण्याच्या आशेने संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

बनावट नियुक्तीपत्रांचा वापर ( Pune PMC Job Scam )

फसवणूक करण्यासाठी महापालिकेच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे. महापालिकेचे बनावट शिक्के तयार करून बनावट पत्रे तयार करण्यात आली. तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून तरुण-तरुणींना नियुक्तीपत्रे देण्यात आली. संबंधितांचा विश्वास बसावा यासाठी काही महिन्यांची वेतन प्रक्रिया देखील करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवा

प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तपास सुरू केला. खेडेकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात पुण्यात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर खेडेकर गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता.

हेही वाचा : LS Marathi म्हणजे काय? महाराष्ट्रातील मराठी न्यूज चॅनेलची वाटचाल आणि डिजिटल विस्तार

खबऱ्याच्या माहितीवरून सापळा

दरम्यान, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचला. मंगळवारी दुपारी खेडेकर पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

टोळीतील इतरांचा शोध सुरू

या प्रकरणात खेडेकरसोबत आणखी कोणाचा सहभाग आहे, फसवणुकीतून नेमकी किती रक्कम उकळण्यात आली, किती जणांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली आणि या प्रकरणामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts