Hartalika Ganesh Chaturthi 2026: यंदा १४ सप्टेंबर रोजी हरितालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये पूजाविधीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आधी हरितालिका पूजन करायचे की गणपतीची प्राणप्रतिष्ठा, याबाबत पंचांगकर्ते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी हरितालिका व्रत आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने अनेक भाविकांमध्ये पूजाविधीच्या क्रमाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आधी हरितालिका पूजन करायचे की गणपतीची प्राणप्रतिष्ठा, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत पंचांगकर्ते यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
त्यांच्या मते, हरितालिका व्रत (Hartalika Teej 2026) आणि गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2026) ही दोन स्वतंत्र व्रते आहेत. त्यामुळे एका व्रताची पूजा केल्यानंतरच दुसरे व्रत करावे, असा अनिवार्य नियम नाही. घरातील परंपरा आणि उपलब्ध मुहूर्तानुसार दोन्ही पूजाविधी करता येतात.
हेही वाचा: जिथे अडथळे होते, तिथेच मिळणार यश! ११ सप्टेंबरला ‘या’ राशींसाठी शुभ दिवस
हरितालिका पूजन कधी करावे?
हरितालिका व्रतासाठी सूर्योदयानंतरचा प्रातःकाळ महत्त्वाचा मानला जातो. यंदा तृतीया तिथीच्या मुहूर्तावर हरितालिका पूजन करण्याचे सांगितले जाते. सूर्योदयानंतर साधारण दोन तासांच्या कालावधीत प्रातःकाळी हरितालिकेचे पूजन (Ganesh Chaturthi Puja Muhurat) करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते यांनी दिली.
गणपतीची प्राणप्रतिष्ठा आधी करता येते का?
होय. हरितालिका पूजन झाल्यानंतरच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी, असे बंधन नाही. भाविकांना आधी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून त्यानंतर हरितालिका पूजन करता येऊ शकते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या विशेष पूजेसाठी मात्र मध्यान्ह काळ महत्त्वाचा मानला जातो. यंदा सकाळी सुमारे ११.१५ ते दुपारी १.४५ या कालावधीत गणपतीचे विशेष पूजन करण्याचा मुहूर्त असल्याचे पंचांगकर्ते यांनी सांगितले आहे. LS Marathi News Channel
दोन्ही व्रतांचे स्वरूप वेगळे
हरितालिका व्रत आणि गणेश चतुर्थीचे व्रत (Hartalika and Ganesh Chaturthi same day) यांचे स्वरूप वेगवेगळे असून, त्यांचे आचरण करणाऱ्या व्यक्तीही प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेनुसार वेगळ्या असू शकतात. काही घरांमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा पुरुषांकडून केली जाते, तर अनेक ठिकाणी महिलाही हा विधी करतात.
त्यामुळे दोन्ही व्रते एकाच दिवशी आल्याने भाविकांनी अनावश्यक संभ्रम न ठेवता आपल्या कुटुंबाची परंपरा, पंचांगातील मुहूर्त आणि शास्त्रविधीनुसार पूजन करावे, असे पंचांगकर्त्यांचे मत आहे.









