Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • यंदा १३ की १४ सप्टेंबर कधी आहे हरतालिका व्रत? तारीख नेमकी कोणती, जाणून घ्या पूजाविधी आणि महत्त्व
संस्कृती

यंदा १३ की १४ सप्टेंबर कधी आहे हरतालिका व्रत? तारीख नेमकी कोणती, जाणून घ्या पूजाविधी आणि महत्त्व

Hartalika Vrat 2026
46
Hartalika Vrat 2026| हरतालिका व्रताची तारीख यंदा १३ की १४ सप्टेंबर, असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. हे व्रत नेमके कोण करतात, पूजा कशी केली जाते आणि या व्रताचे धार्मिक महत्त्व काय आहे? जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखातून.

हिंदू धर्मातील व्रत-उत्सवांमध्ये हरतालिका तीजला (Hartalika Vrat 2026) विशेष स्थान आहे. हे व्रत गणेश आगमनाच्या एक दिवस आधी केलं जात. विशेषतः विवाहित महिलांकडून पतीचे दीर्घायुष्य, सुखी वैवाहिक जीवन आणि अखंड सौभाग्याची कामना करत हे व्रत श्रद्धेने केले जाते. अविवाहित मुलीही मनासारखा आणि योग्य जीवनसाथी मिळावा, या इच्छेने हरतालिकेचे व्रत करतात. चला तर जाणून घेऊयात यंदा कधी साजरा केली जाणार आहे.

यंदा हरतालिका व्रत 2026 कधी? (Hartalika Vrat 2026)

हरतालिका व्रत (Hartalika Vrat 2026) हा भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जाणारा महत्वाचा सण आहे. यंदा तृतीया तिथी १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ८ मिनिटांनी सुरू होणार असून १४ सप्टेंबरला सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होणार आहे. सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी कोणत्या दिवशी आहे, यानुसार व्रताची तारीख ठरवली जाते. त्यामुळे यंदा हरतालिका तीजचे व्रत सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी (Hartalika Teej September 14) केले जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा हरतालिका व्रत आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी (Hartalika Vrat and Ganesh Chaturthi) , म्हणजेच १४ सप्टेंबरला येत आहेत. सामान्यतः हे सण वेगवेगळ्या दिवशी येतात, परंतु यावर्षी तृतीया आणि चतुर्थी तिथी एकाच दिवशी आल्यामुळे हे दुर्मिळ योग(Hartalika Tritiya Tithi)  जुळून आले आहेत.

हेही वाचा: https://lokshevay.com/pune/santosh-pandit-case-court-order-police-custody-judicial-custody-yerwada-jail/37801/

पूजा वेळ (Puja Muhurat)

हरतालिका व्रताला महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करणे आवश्यक असते व त्याचा पूजन मुहूर्त सकाळी ०६:०५ ते ०७:०६ व संध्याकाळी प्रदोष काळात आहे. तृतीया तिथी १४ सप्टेंबर सकाळी ७:०६ वाजेपर्यंत आहे गणेश चतुर्थीची पूजा सकाळी ११:०२ ते दुपारी १:३१ वाजेपर्यंत केली जाऊ शकते. चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर सकाळी ७:०६ पासून १५ सप्टेंबर सकाळी ७:४४ पर्यंत आहे. चंद्रदर्शन टाळण्याचा कालावधी सकाळी ९:०६ ते रात्री ८:०४ असा आहे.

हरतालिका पूजाविधी कसा करावा? (Hartalika Teej religious significance)

व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान केली जातात. त्यानंतर व्रताचा संकल्प केला जातो. पूजा करण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या प्रतिमा किंवा वाळू-मातीपासून तयार केलेल्या शिव-पार्वतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

यानंतर गणेश पूजन करून शिव-पार्वतीला फुले, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य आणि इतर पूजासाहित्य अर्पण केले जाते. हरतालिका व्रताची कथा वाचली किंवा ऐकली जाते आणि शेवटी आरती करून पूजा पूर्ण केली जाते. प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार पूजाविधीत काही फरक असू शकतो.

हरतालिका व्रतचे महत्त्व काय?

हरतालिका व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पवित्र नात्याशी संबंधित व्रत मानले जाते. विवाहित महिला वैवाहिक जीवनातील सुख-समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत श्रद्धेने करतात. अविवाहित मुलीही चांगला जीवनसाथी मिळावा, या उद्देशाने व्रत करतात. त्यामुळे महिलांसाठी या सणाला धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts