Santosh Pandit Case: संतोष पंडित यांच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असलेल्या संतोष पंडित (Santosh Pandit Case) प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या पंडित यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने नेमका काय आदेश दिला? पंडितांची पुढची वाटचाल कुठे होणार? जाणून घ्या आजच्या रिपोर्टमध्ये.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले संतोष पंडित Santosh Pandit latest news) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी पंडित यांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजार केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हेही वाचा: EPFO सदस्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळतात हे 3 मोठे फायदे; क्लेमची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
या आदेशानंतर संतोष पंडित यांची येरवडा कारागृहात रवानगी (Santosh Pandit Yerwada jail) करण्यात आली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरून आक्षेपार्ह आणि अश्लील स्वरूपाचा मांजकूर तसेच संबंधित व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पंडित (Santosh Pandit news) यांना अटक केली होती.
यापूर्वी पोलीस कोठडी
अटकेनंतर पंडित यांना न्यायालयात हजर Santosh Pandit Pune case) करण्यात आले होते. प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयाने त्यांना यापूर्वी 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात आणण्यात आले.
पोलिसांकडून आता पंडित यांच्या सोशल मीडिया अकाउंटची (social media objectionable content case) तपासणी केली जात आहे. संबंधित अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आलेले व्हिडिओ, पोस्ट आणि आक्षेपार्ह मजकूर यांचा तपास सुरू आहे. या सामग्रीचा स्रोत, ती कधी आणि कशा पद्धतीने प्रसारित करण्यात आली, तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींची माहिती पोलीस तपासत आहेत. (Pune Latest News)
राजकीय वातावरण तापले
संतोष पंडित यांच्या अटकेनंतर पुण्यात या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरील वक्तव्यांवर कारवाई योग्य आहे की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आणली जात आहे, यावरूनही चर्चा रंगली आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरू असून प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे.









