Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यात गणेशोत्सवात ‘ड्राय डे’; कुठे-कधी मद्यविक्री बंद? जाणून घ्या संपूर्ण नियम
Pune

पुण्यात गणेशोत्सवात ‘ड्राय डे’; कुठे-कधी मद्यविक्री बंद? जाणून घ्या संपूर्ण नियम

Pune Dry Day 2026
42
Pune Dry Day 2026: गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना पुण्यात मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जारी करण्यात आला असून, कुठे आणि कधी मद्यविक्री बंद राहणार, जाणून घ्या.

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मद्यविक्रीबाबत महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरातील काही भागांमध्ये ठराविक दिवशी तर काही संवेदनशील भागांमध्ये सलग काही दिवस मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे शहरात १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध टप्प्यांमध्ये मद्यविक्रीवर निर्बंध लागू राहतील. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचा मार्ग आणि संवेदनशील परिसर लक्षात घेऊन प्रशासनाने हे निर्णय घेतले आहेत.

१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीनिमित्त ड्राय डे

गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे-१ राज्य उत्पादन शुल्क कार्यक्षेत्रात दिवसभर मद्यविक्री बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील मद्यविक्रीची दुकाने आणि आस्थापने संपूर्ण दिवस बंद ठेवावी लागणार आहेत.

हेही वाचा: नोकरदारांनो, पगार २१ हजारांपर्यंत? मग मिळू शकतो हजारोंचा बोनस; जाणून घ्या पात्रता अन् संपूर्ण नियम!

अनंत चतुर्दशीलाही दिवसभर मद्यविक्री बंद

२५ सप्टेंबर २०२६ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवशीही संपूर्ण दिवस मद्यविक्रीला परवानगी राहणार नाही. पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका याच दिवशी निघणार असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. ( LS Marathi News )

२६ सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत निर्बंध

अनंत चतुर्दशीनंतरच्या दिवशी, म्हणजे २६ सप्टेंबर रोजीही विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत संबंधित भागांमध्ये मद्यविक्री बंद राहणार आहे. विशेषतः गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या मार्गावरील मद्यविक्रीची आस्थापने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाचवा आणि सातवा दिवसही महत्त्वाचा

गणेशोत्सवातील पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुका ज्या भागातून जाणार आहेत, त्या परिसरात मिरवणूक संपेपर्यंत मद्यविक्रीवर निर्बंध असतील. हे निर्बंध संपूर्ण शहरासाठी नसून संबंधित मिरवणूक मार्ग आणि परिसरापुरते मर्यादित असतील.

खडक, विश्रामबाग आणि फरासखाना परिसरात विशेष निर्बंध

पुणे पोलीस आयुक्तालयातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या परिसरात १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रशासनाने विशेष मद्यविक्री निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

गणेशोत्सवासाठी पुणे प्रशासन सज्ज

दरम्यान, गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पुणे प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. महापालिका, पोलीस, जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांकडून शहरातील विविध भागांची पाहणी करण्यात येत आहे.

रस्त्यांची स्थिती, खड्डे, गणेश मंडळांचे मंडप, विद्युत व्यवस्था, महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेसह कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे तयारीची पाहणी केली.

गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिक रस्त्यावर येणार असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षितता आणि विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पाडण्यावर प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts