Lalbaugcha Raja Darshan 2026 : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन सोहळ्याने उत्सवाची सांगता होणार आहे. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा 93वा गणेशोत्सव आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन कधीपासून सुरू होणार? ( Lalbaugcha Raja Darshan 2026 )
गणेश चतुर्थीच्या दिवशी, सोमवार 14 सप्टेंबर 2026 रोजी गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. उत्सवाची सांगता शुक्रवार 25 सप्टेंबर 2026 रोजी अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाने होईल.
मुखदर्शन आणि चरणस्पर्श दर्शनाची व्यवस्था( Lalbaugcha Raja Darshan )
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांतून येतात. यंदाही भाविकांसाठी मुखदर्शन आणि चरणस्पर्श दर्शनाच्या रांगा असणार आहेत. प्रसिद्धीच्या आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांनी गर्दीचा विचार करून नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
लालबागचा राजा मंडळ श्री गणेश नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लालबाग, परळ, मुंबई येथे आहे. जवळच्या रेल्वे स्थानकांमधून लालबाग परिसरात पोहोचता येते. चिचपोकळी, करी रोड आणि भायखळा ही परिसरातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.
हेही वाचा : गणपती सजावट Ideas: घरच्या घरी कमी खर्चात करा सुंदर मखर;
यंदा लालबागच्या राजाचा 93वा गणेशोत्सव ( Lalbaugcha Raja )
लालबागच्या राजाच्या 2026 गणेशोत्सवाची तयारी जूनपासूनच सुरू झाली. 9 जून 2026 रोजी पहाटे 5 वाजता श्री गणेश मुहूर्त पूजन करण्यात आले. मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते हे पूजन पार पडले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान
लालबागचा राजा हा केवळ मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांपैकी एक नसून भाविकांसाठी श्रद्धेचे मोठे केंद्र मानले जाते. दरवर्षी दर्शनासाठी मोठी गर्दी होते आणि गणेशोत्सवाच्या काळात लालबाग परिसरात उत्सवाचे विशेष वातावरण पाहायला मिळते.
भाविकांनी काय काळजी घ्यावी?
- गर्दीच्या वेळेत शक्यतो लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे.
- मोबाईल, पर्स आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.
- ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी आणि प्रतीक्षा वेळ लक्षात घेऊन दर्शनाचे नियोजन करावे.
- रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास पार्किंगची अडचण टाळता येऊ शकते.
- दर्शनासाठी जाण्यापूर्वी मंडळाची अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत अपडेट्स तपासावेत.









