Lalbaugcha Raja Visarjan 2026 : “गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!” आणि “शान कुणाची? लालबागच्या राजाची!” या जयघोषाने आज मुंबईचा लालबाग परिसर दुमदुमून गेला आहे. गणेशोत्सवाच्या १२ दिवसांच्या उत्सवानंतर मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यंदाही मोठ्या संख्येने भाविक मुंबईत दाखल झाले. आज विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर लालबाग मार्केट परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पारंपरिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाच्या जयघोषात मिरवणूक पुढे सरकत आहे.
१२ दिवसांच्या भक्तीनंतर राजाचा निरोप ( Lalbaugcha Raja Visarjan 2026 )
यंदा लालबागच्या राजाचा ९३ वा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. १४ सप्टेंबरपासून सुरू झालेला गणेशोत्सव आज, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाने पूर्ण होत आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुखदर्शनाची रांग २४ सप्टेंबरच्या मध्यरात्री बंद करण्यात आली होती. त्यानंतर आज राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्यात आली.
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप
लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू होताच परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ढोल-ताशांचा निनाद, पारंपरिक वाद्यवृंद आणि बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला आहे. व्यापारी आणि स्थानिकांकडूनही लालबागच्या राजाला हार अर्पण करून भावपूर्ण निरोप दिला जात आहे.
हेही वाचा : गणपती बाप्पा मोरया! आज अनंत चतुर्दशी; मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, पाहा Live
भाविकांच्या गर्दीने मुंबई फुलली
गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. २२ सप्टेंबरलाही दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक लालबागमध्ये दाखल झाले होते. आज विसर्जन मिरवणुकीमुळे लालबाग आणि आसपासच्या भागात मोठी गर्दी असून, बाप्पाच्या शेवटच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी उपस्थिती आहे.
लालबागच्या राजाचे ऑनलाइन दर्शन ( Lalbaugcha Raja 2026 )
मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, यंदा लालबागच्या राजाचे ऑनलाइन दर्शन १४ सप्टेंबरपासून विसर्जनापर्यंत उपलब्ध करून देण्यात आले होते. अधिकृत वेबसाइट, YouTube, Facebook, Instagram आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून भाविकांना दर्शनाची सुविधा देण्यात आली.
“गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात आता मुंबईचा लाडका राजा भक्तांचा निरोप घेत आहे.








