Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ZEE Marathi Awards 2026 : वामन हरी पेठे प्रस्तुत ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा जल्लोष! ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला मुख्य सोहळा
महाराष्ट्र

ZEE Marathi Awards 2026 : वामन हरी पेठे प्रस्तुत ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा जल्लोष! ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला मुख्य सोहळा

ZEE Marathi Awards 2026
2
ZEE Marathi Awards 2026 : वामन हरी पेठे प्रस्तुत ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’चा नामांकन सोहळा पार पडल्यानंतर आता मुख्य कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे. ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी रंगणाऱ्या या सोहळ्यात मराठी मालिकांमधील कलाकार आणि त्यांच्या भूमिकांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. लाडक्या मालिकांमधील कलाकारांची चुरस, लोकप्रिय जोड्यांचे आकर्षण आणि मानाच्या पुरस्कारांची उत्सुकता; सायंकाळी ७ वाजता पाहायला विसरू नका झी मराठी अवॉर्ड्स २०२६!

मराठी टेलिव्हिजनवरील (Marathi Television)  लोकप्रिय मालिकांमधील कलाकारांचा सन्मान करणाऱ्या ‘वामन हरी पेठे प्रस्तुत (Powered by vaman hari peth jewelers) झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. वर्षभर आपल्या अभिनयाने, व्यक्तिरेखांनी आणि कथानकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कार सोहळ्यात गौरवले जाणार आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी विविध मालिकांमधील नायक, नायिका, खलनायक, खलनायिका, बालकलाकार आणि लोकप्रिय जोड्यांना नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे यंदा कोणत्या कलाकाराच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळणार आणि कोणती मालिका पुरस्कारांवर आपले नाव कोरणार, याची उत्सुकता वाढली आहे.

झी मराठी वाहिनीने (Zee Marathi Channel) मुख्य पुरस्कार सोहळ्याच्या तारखा जाहीर केल्या असून, हा कार्यक्रम ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. त्याआधी २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता नामांकन सोहळा प्रसारित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांची नामांकने आणि आगामी पुरस्कार सोहळ्याची (Award Ceremony)झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.

‘सहलीला जायाचा… जायाचा सहलीला!’ नामांकन सोहळ्याची खास थीम  (Nomination Theme)

यंदाच्या नामांकन सोहळ्याला ‘सहलीला जायाचा… जायाचा सहलीला!’ ही हटके संकल्पना देण्यात आली आहे. या संकल्पनेतून झी मराठी परिवारातील कलाकारांचा उत्साही आणि मजेशीर अंदाज पाहायला मिळणार आहे. आकर्षक पोशाख, रंगतदार सादरीकरणे, कलाकारांमधील गप्पा आणि रॅम्प वॉक (ramp walk) यांमुळे नामांकन सोहळ्याला वेगळीच रंगत आली आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली आहे. कलाकारांशी संवाद साधताना त्यांच्या आठवणी, मजेशीर किस्से आणि सहलीशी संबंधित अनुभव यांना उजाळा देण्यात आला आहे. नामांकन मिळालेल्या कलाकारांचा मंचावर सन्मानही करण्यात आला. त्यामुळे मुख्य पुरस्कार सोहळ्यापूर्वीच प्रेक्षकांना मनोरंजनाची खास मेजवानी मिळणार आहे.

कोणत्या मालिकांमध्ये रंगणार पुरस्कारांची चुरस?

यंदाच्या नामांकनांमध्ये ‘तारिणी’ (taraini), ‘कमळी’(kamali), ‘सनई चौघडे’,(sanai Choughade) ‘दीप ज्योती’(Dip Jyoti), ‘वीण दोघांतली ही तुटेना’(Vin Dhoghatali Tutena) , ‘कृष्णाईच्या लेकी’(Krushnaichya Laki) , ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ (Lakshmi Niwas and Savlyachi Janu Savali) या मालिकांमधील कलाकारांचा समावेश आहे. या मालिकांमधील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांमध्ये आपापली ओळख निर्माण केली असून, आता पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा गौरव होणार आहे. सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारासाठी या मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. प्रत्येक मालिकेची कथा, कलाकारांचा अभिनय आणि प्रेक्षकांशी निर्माण झालेली नाळ यामुळे यंदाच्या पुरस्कारांबाबत उत्सुकता आहे. मात्र, अंतिम पुरस्कार कोणाला मिळणार, हे सोहळ्यातच स्पष्ट होईल.

सर्वोत्कृष्ट जोडीच्या नामांकनांकडे विशेष लक्ष

मालिकांमधील नायक-नायिकांच्या (Hero – Heroin)जोड्यांना प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत असते. यंदाच्या झी मराठी अवॉर्ड्समध्येही लोकप्रिय जोड्यांना नामांकने मिळाली आहेत. जय-शर्वरी, केदार-तारिणी, ऋषी-कमळी, दीप-ज्योती, समर-स्वानंदी, शंकर-गौरी, सिद्धू-भावना आणि सारंग-सावली या जोड्यांचा सर्वोत्कृष्ट जोडीच्या नामांकनांमध्ये समावेश आहे. या जोड्यांच्या व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध, भावनिक प्रसंग आणि मालिकेतील महत्त्वाचे क्षण प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे यंदा सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार कोण पटकावणार, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. आपल्या आवडत्या जोडीला पुरस्कार मिळावा, अशी अपेक्षा अनेक चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Marathi Movies Release Today : एकाच दिवशी सहा मराठी चित्रपट प्रदर्शित; सचिन पिळगावकर ते शिवाजी साटम, कोणते सिनेमे पाहायला मिळणार?

सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेच्या पुरस्कारासाठी कोणाची नावे?

सर्वोत्कृष्ट नायकाच्या नामांकनांमध्ये सारंग, सिद्धू, शंकर, समर, दीप, जय, ऋषी आणि केदार या व्यक्तिरेखांचा समावेश आहे. तर सर्वोत्कृष्ट नायिकेच्या नामांकनांमध्ये तारिणी, कमळी, शर्वरी, ज्योती, स्वानंदी, गौरी, जान्हवी, भावना आणि सावली या व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेचा मालिकेतील प्रवास वेगळा आहे. काही व्यक्तिरेखा त्यांच्या संघर्षामुळे, काही भावनिक प्रसंगांमुळे, तर काही त्यांच्या निर्णयांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. त्यामुळे या पुरस्कारांच्या निकालाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

खलनायक आणि खलनायिकांच्या अभिनयाचीही चर्चा(Villan)

मालिकेतील संघर्ष अधिक रंगतदार करण्यात खलनायक आणि खलनायिकांच्या व्यक्तिरेखांचा मोठा वाटा असतो. यंदा सर्वोत्कृष्ट खलनायिकेच्या नामांकनांमध्ये भैरवी, इंदुराणी, मल्लिका, प्रीती, कामिनी आणि पद्मिनी या व्यक्तिरेखांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या पुरस्कारासाठी राजकुमार, जयंत, अंशुमन आणि युवराज या व्यक्तिरेखांना नामांकने मिळाली आहेत. या व्यक्तिरेखांमुळे कथानकाला मिळणारे वळण आणि कलाकारांच्या अभिनयातून उभा राहणारा नाट्यमय परिणाम यामुळे या श्रेणीतील स्पर्धाही लक्षवेधी ठरणार आहे.

बालकलाकार आणि सूत्रसंचालकांनाही नामांकने (Child Artiest and Anchore)

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात बालकलाकारांच्या कामालाही महत्त्व देण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराच्या नामांकनांमध्ये अबीर, ओवी, शुभ्रा, रमा, आरव आणि इरा या व्यक्तिरेखांचा समावेश आहे. कमी वयात अभिनयातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या कलाकारांपैकी कोणाला पुरस्कार मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सूत्रसंचालनाच्या श्रेणीत संकर्षण कऱ्हाडे, मृण्मयी देशपांडे आणि अतुल भगरे यांना नामांकने मिळाली आहेत. मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करताना संवादकौशल्य, विनोदाची शैली आणि प्रेक्षकांशी साधला जाणारा संवाद या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे या श्रेणीतील निकालाकडेही लक्ष असेल.

मुख्य पुरस्कार सोहळ्यात काय पाहायला मिळणार?

मुख्य पुरस्कार सोहळ्यात कलाकारांचे खास सादरीकरण, लोकप्रिय जोड्यांचे नृत्य (Dance) आणि मनोरंजनाची विविध रूपे पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. नामांकन सोहळ्याच्या प्रोमोमध्ये कलाकारांचे आकर्षक लूक आणि काही खास सादरीकरणांची झलक दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य कार्यक्रमात कोणते कलाकार कोणत्या अंदाजात मंचावर येतात, याची उत्सुकता वाढली आहे. मालिकांमधील कलाकारांना एकाच मंचावर पाहण्याची संधी, त्यांच्या कामाचा सन्मान आणि प्रेक्षकांच्या पसंतीचे प्रतिबिंब या पुरस्कार सोहळ्यात दिसणार आहे. वर्षभर मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकारांसाठीही हा सोहळा महत्त्वाचा ठरणार आहे.

तारीख आणि वेळ लक्षात ठेवा!

झी मराठी अवॉर्ड्स २०२६ चा नामांकन सोहळा २५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. तर मुख्य पुरस्कार सोहळा ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. तेव्हा आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकारांना मिळालेली नामांकने, लोकप्रिय जोड्यांची चुरस आणि मानाच्या पुरस्कारांचा थरार पाहायला विसरू नका. वामन हरी पेठे प्रस्तुत ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२६’ — ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी, संध्याकाळी ७ वाजता, फक्त झी मराठीवर!

हेही वाचा : Prime Video Add-on : Sony LIV आता Prime Video वर! क्रिकेट, वेब सीरिज आणि टीव्ही शो एकाच प्लॅटफॉर्मवर; सबस्क्रिप्शनची किंमत किती?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts