• Home
  • ताज्या बातम्या
  • मॅरेथॉननंतर काळाचा घाला; निवृत्त शास्त्रज्ञ संजय कदम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
गुन्हा

मॅरेथॉननंतर काळाचा घाला; निवृत्त शास्त्रज्ञ संजय कदम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sanjay Kadam Satara
107

-प्रशांत जगताप / सातारा प्रतिनिधी

Sanjay Kadam Satara : सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभागी होऊन धावण्याचा आनंद घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात काळाने घात केला. पाटण तालुक्यातील कडवे बुद्रुक येथील रहिवासी तथा पुण्यात स्थायिक असलेले निवृत्त शास्त्रज्ञ संजय ऊर्फ तानाजी श्यामराव कदम (वय ६५) यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.मॅरेथॉननंतर बोगदा परिसरात घडलेल्या या घटनेने धावपटू, नातेवाईक, मित्रपरिवार आणि कडवे बुद्रुक ग्रामस्थांवर शोककळा पसरली.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये घेतला उत्साहाने सहभाग ( Satara Hill Half Marathon )

संजय कदम हे पुणे येथे वास्तव्यास होते. भारत सरकारच्या माध्यमातून संशोधनाच्या कार्यासाठी त्यांना लंडन येथे जाण्याची संधी मिळाली होती. संशोधन क्षेत्रात काम करताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली होती. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःला सक्रिय ठेवत धावण्याची आवड जोपासली होती. नियमित धावण्याचा सराव करणारे कदम याच आवडीपोटी सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग घेतल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, बोगदा परिसरात अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना होऊन ते अस्वस्थ झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, नियतीचा घाला इतका अचानक होता की, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : साताऱ्यात ट्रान्सफॉर्मर चोरीचा छडा; 14 गुन्हे उघड, 5.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

उपचार सुरू होण्यापूर्वीच दुर्दैवी निधन ( Sanjay Kadam Satara )

ज्या धावण्याच्या आवडीने त्यांनी आयुष्यभर स्वतःला निरोगी आणि उत्साही ठेवले, त्याच धावण्याच्या स्पर्धेनंतर त्यांचा जीवनप्रवास अचानक थांबला. कदम यांच्या आकस्मिक निधनाने मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंनाही मोठा धक्का बसला आहे.कदम यांच्या निधनाची वार्ता कडवे बुद्रुक येथे पोहोचताच गावावर शोककळा पसरली. अभ्यासू वृत्ती, संशोधन क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि धावण्याची विलक्षण आवड असलेल्या कदम यांच्या अचानक जाण्याने ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे. एक कर्तृत्ववान, अभ्यासू आणि सदैव उत्साही व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळव्या वातावरणात त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics, UI & UX.Education : Bachelor Of Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts