प्रशांत जगताप | सातारा प्रतिनिधी
Shirwal Woman Dead Body : खंडाळा राजेवाडी येथे शिंदेवाडी-भोर रस्त्यालगत शेताशेजारील चारीमध्ये सुमारे २५ ते ३० वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सोमवारी (दि. १४) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
राजेवाडी येथे शेताशेजारी आढळला महिलेचा मृतदेह ( Shirwal Woman Dead Body )
राजेवाडी येथील श्रीमती अलका मदन दिवाण यांच्या शेताशेजारील चारीमध्ये महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलीस पाटील निलेश तांगडे यांनी शिरवळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित महिलेच्या अंगावर जांभळ्या रंगाचा सलवार व पायजमा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन व इनक्वेस्ट पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ५७/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती मस्के तपास करीत आहेत. महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून परिसरात चौकशी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
हेही वाचा : जरांगेंच्या मुंबई दौऱ्याला पोलिसांचा अडथळा? डिफेंडर-अॅम्ब्युलन्ससह ताफा सज्ज, पुढे काय होणार?









