Breaking News :
  • Home
  • Top News
  • गणेश आगमन मिरवणुकीत बीम लाईटचा वापर; कुडाळमधील दोन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे
गुन्हा

गणेश आगमन मिरवणुकीत बीम लाईटचा वापर; कुडाळमधील दोन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे

Beam Light Case
4

प्रशांत जगताप | सातारा प्रतिनिधी

Beam Light Case : गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान बीम लाईटचा वापर करून पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुडाळ येथील दोन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह साउंड सिस्टीम व लाईट व्यावसायिकांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बीम लाईट वापरल्याप्रकरणी दोन गणेश मंडळांवर पोलिसांची कारवाई ( Beam Light Case )

दि. १४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते रात्री ८.५०च्या सुमारास कुडाळ बाजारपेठ ते पियुष चौकादरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर गणेश आगमन मिरवणूक सुरू होती. यावेळी राजमुद्रा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत वाहन क्रमांक एमएच ४६ एफ ६०७२ वर बीम लाईटचा वापर करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष राजेश हणमंतराव शिंदे, श्री दत्त ऑडिओ साउंड सिस्टीमचे मालक अनिकेत शिर्के, साउंड ऑपरेटर आर्यन रमेश जाधव आणि ए.एस. लाईट्सचे निहाल नवनाथ लेंबे यांच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल सूरज शिवाजी वाघमळे यांनी सरकारतर्फे तक्रार दिली

हेही वाचा : जरांगेंच्या मुंबई दौऱ्याला पोलिसांचा अडथळा? डिफेंडर-अॅम्ब्युलन्ससह ताफा सज्ज, पुढे काय होणार?

साउंड सिस्टीम आणि लाईट व्यावसायिकांचाही समावेश ( Kudal Ganpati Miravnuk )

दरम्यान, याच ठिकाणी श्री गणेश मित्र मंडळाच्या मिरवणुकीतही बीम लाईटचा वापर झाल्याचे समोर आले. वाहन क्रमांक एमएच ०४ ईएल ८८०९ वर बीम लाईट लावल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष विरेंद्र सुरेशराव शिंदे, साई-७१ प्लस साउंड सिस्टीमचे मालक सागर अजित वाडेकर, साउंड ऑपरेटर सूरज सागर शिंदे आणि विरा लाईट्सचे तेजस भीमराव येवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल ओंकार उत्तम दीक्षित यांनी तक्रार दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दि. ३ सप्टेंबर रोजी बी.एन.एस.एस. कलम १६३ अन्वये लेझर व संबंधित प्रकाशयंत्रणेबाबत आदेश जारी केले आहेत. तसेच मेढा पोलिस ठाण्याकडून दि. ८ सप्टेंबर रोजी बी.एन.एस.एस. कलम १६८ अन्वये नोटीस देण्यात आली होती. या आदेश व नोटिशीचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधितांवर आहे. या कारवाईमुळे गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये प्रतिबंधित प्रकाशयंत्रणा व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts