Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • एआयच्या मदतीने शिवेंद्रसिंहराजेंचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल; तीन फेसबुक खाती आणि युट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा
महाराष्ट्र

एआयच्या मदतीने शिवेंद्रसिंहराजेंचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल; तीन फेसबुक खाती आणि युट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा

Shivendrasinhraje Bhosale
49

सातारा | प्रशांत जगताप, प्रतिनिधी

Shivendrasinhraje Bhosale: सोशल मीडियावर एआय आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून बनावट छायाचित्रे तयार करून प्रसारित करण्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात समोर आला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या राजधानी सातारा दहीहंडी उत्सवातील मूळ छायाचित्रात छेडछाड करून ते आक्षेपार्ह स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तीन फेसबुक खात्यांसह एका युट्यूब वृत्तवाहिनीशी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Satara Latest News)

हेही वाचा: ९ सप्टेंबरला ‘या’ राशींची बल्ले-बल्ले! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचेही संकेत

शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांचे जनसंपर्क अधिकारी अमर बाळासाहेब मोकाशी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ८ सप्टेंबर रोजी ‘प्रतिक थोरात देशभक्त Gen Z’ या फेसबुक खात्यावरून शिवेंद्रसिंहराजे यांचा कथित बनावट व आक्षेपार्ह फोटो प्रसारित करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

६ सप्टेंबर रोजी झालेल्या राजधानी सातारा दहीहंडी उत्सवातील मूळ छायाचित्राचा वापर करून त्यामध्ये एका महिलेचा आक्षेपार्ह पद्धतीने नृत्य करतानाचा फोटो (YouTube channel cas)  जोडण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच शिवेंद्रसिंहराजे त्या महिलेकडे पाहत असल्याचे भासविण्यात आले असून, त्यासोबत बदनामीकारक मजकूरही प्रसारित केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अन्य सोशल मीडिया खात्यांवरूनही प्रसार

हे छायाचित्र ‘सोनाली देशमुख’ आणि ‘हरी शिंदे’ या नावाच्या फेसबुक खात्यांवरूनही प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच ‘माणदेश प्राइम न्यूज’ या युट्यूब चॅनेलवरूनही संबंधित फोटो व मजकूर प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (social media crime)

या प्रकारामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सामाजिक व सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

बीएनएस आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५३(२), ३५६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल (IT Act Section 67)  करण्यात आला आहे. एआय, मॉर्फिंग आणि डिजिटल संपादनाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या कथित बनावट छायाचित्राचा स्रोत आणि प्रसारामागील व्यक्तींचा सातारा शहर पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts