• Home
  • ताज्या बातम्या
  • मुलीच्या वर्तणुकीवरून वाद अन् टोकाचे पाऊल; साताऱ्यात हर्षदा हत्याप्रकरण, नेमकं काय घडलं?
गुन्हा

मुलीच्या वर्तणुकीवरून वाद अन् टोकाचे पाऊल; साताऱ्यात हर्षदा हत्याप्रकरण, नेमकं काय घडलं?

Harshada Jadhav Murder Case
96
Harshada Jadhav Murder Case: साताऱ्यात १९ वर्षीय हर्षदाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तिच्या वर्तणुकीवरून कुटुंबात सुरू असलेल्या वादातून तिचा जीव घेतल्याचा आरोप असून, या प्रकरणी वडील आणि चुलत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सातारा जिल्ह्यातील राजेवाडी परिसरात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी तिची ओळख पटवली असून, तिच्या मृत्यूमागे तिचे वडील आणि चुलते असल्याचा आरोप तपासातून समोर आला आहे. हर्षदा जाधव असे मृत तरुणीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सध्या दोघांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

१६ दिवसांच्या तपासानंतर मृतदेहाची ओळख

१४ सप्टेंबर रोजी खंडाळा तालुक्यातील राजेवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला.

हेही वाचा: आंदोलनाच्या एक दिवस आधी अभिजीत दिपकेंसोबत घडलं असं काही; पहा मरीन ड्राईव्हचा व्हायरल VIDEO

घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेला. सुमारे १६ दिवसांच्या तपासानंतर मृत तरुणीची ओळख हर्षदा जाधव अशी पटल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले.

कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल? ( Harshada Jadhav )

हर्षदा पुणे परिसरात राहत होती आणि तिच्या वर्तणुकीवरून कुटुंबात वारंवार वाद होत असल्याचा दावा तपासात समोर आला आहे. तिच्या मित्र- मैत्रीणींसोबतच्या संबंधांवरून आणि घराबाहेर जाण्यावरून कुटुंबात मतभेद असल्याचे पोलिसांनी तपासात नमूद केले आहे. मात्र, हे आरोपींकडून सांगण्यात आलेले कारण असून, त्याची स्वतंत्रपणे पडताळणी तपास यंत्रणेकडून केली जात आहे.

जेवायला नेण्याच्या बहाण्याने बाहेर नेल्याचा आरोप

पोलिसांच्या तपासानुसार, हर्षदाला जेवणासाठी बाहेर घेऊन जाण्याच्या बहाण्याने वाहनातून नेण्यात आले. त्यानंतर तिच्यावर हल्ला करून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. मृतदेह राजेवाडी परिसरात आणून टाकण्यात आल्याचेही तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणात हर्षदाचे वडील हणुमंत जाधव आणि चुलते बाळू जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.

तपासातून आणखी माहिती समोर येणार ( Satara Harshada Jadhav )

या घटनेमागे नेमके कारण काय होते, हत्येपूर्वी नेमका घटनाक्रम काय घडला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे हर्षदाच्या वर्तणुकीबाबत आरोपींकडून करण्यात आलेले दावे आणि हत्येमागील कारण याबाबत अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाने कौटुंबिक मतभेद, तरुणींच्या वैयक्तिक स्वातंत्र्याबाबतचे संघर्ष आणि हिंसक मार्गाने वाद सोडवण्याच्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts