• Home
  • ताज्या बातम्या
  • थिएटरनंतर ‘हैवान’ची OTT एन्ट्री! अक्षय कुमार-सैफ अली खानचा सिनेमा कुठे पाहाल?
मनोरंजन

थिएटरनंतर ‘हैवान’ची OTT एन्ट्री! अक्षय कुमार-सैफ अली खानचा सिनेमा कुठे पाहाल?

Haiwaan OTT Release
83
Haiwaan OTT Release: अक्षय कुमार आणि सैफ अली खान स्टारर “हैवान’ ने थिएटरनंतर आता OTTकडे मोर्चा वळवला आहे. सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेल्या या सिनेमाच्या डिजिटल रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. “हैवान कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवर आणि कधी पाहता येणार, जाणून घ्या.

अक्षय कुमार आणि सैफ अली खान (Akshay Saif Movie) यांना पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर पाहण्याची संधी “हैवान” या सिनेमातुन प्रेक्षकांना (Haiwaan OTT Release) मिळाली. मोठ्या अपेक्षांसह थिएटरमध्ये दाखल झालेल्या या चित्रपटाची सध्या OTT रिलीजच्या पार्श्वभूमीवर चर्चा रंगली आहे. थिएटरमधील प्रदर्शनानंतर आता हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची तयारी (Haiwaan Movie OTT) करत असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा: महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन! गांधी जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा सत्य-अहिंसेचे सुंदर संदेश

घरबसल्या पाहता येणार थ्रिलर?

‘हैवान’ हा सस्पेन्स आणि सायकॉलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट आहे. प्रियदर्शन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. आता थिएटर रननंतर प्रेक्षकांना या सिनेमाची OTT वर येण्याची प्रतीक्षा आहे.

कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे?

उपलब्ध माहितीनुसार, ‘हैवान’ चे डिजिटल हक्क Sony LIVकडे (SonyLIV) असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चित्रपटाची OTT रिलीज याच प्लॅटफॉर्मवर होण्याची शक्यता आहे.

काही रिपोर्ट्समध्ये, ६ नोव्हेंबर २०२६ ही संभाव्य डिजिटल रिलीज तारीख सांगितली जात आहे. मात्र, निर्माते किंवा Sony LIV कडून अधिकृत घोषणा होईपर्यंत ही तारीख निश्चित मानता येणार नाही.

अक्षय – सैफचे जोडी पुन्हा एकदा चर्चेत

अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी यापूर्वी ‘टशन’ मध्ये एकत्र काम केले होते. अनेक वर्षानंतर ही जोडी ‘हैवान’मधून पून्हा प्रेक्षकांसमोर आली. यावेळी दोन्ही कलाकारांना थ्रिलरच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे चित्रपटाच्या घोषणेपासूनच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक

‘हैवान’ची कथा पूर्णपणे नवी नसून हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट **‘ओप्पम’**चा हिंदी रिमेक आहे. या मूळ सिनेमात मोहनलाल यांनी प्रमुख भूमिका साकारली होती आणि दिग्दर्शन प्रियदर्शन यांचेच होते.

‘ओप्पम’ची कथा एका दृष्टिहीन व्यक्तीभोवती फिरते. गुन्हा, रहस्य आणि संशय यामुळे कथेत अनेक नाट्यमय वळणं येतात. हिंदी आवृत्तीत याच कथेला अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या माध्यमातून नव्या पद्धतीने मांडण्यात आले आहे.

OTTवर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळणार?

थिएटरमध्ये चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि OTTवर मिळणारा प्रतिसाद अनेकदा वेगळा असतो. घरच्या घरी आरामात चित्रपट पाहण्याची संधी मिळाल्यानंतर ‘हैवान’ला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सध्या चाहत्यांचे लक्ष चित्रपटाच्या अधिकृत OTT रिलीज डेटवर लागले आहे. Sony LIV आणि निर्मात्यांकडून घोषणा झाल्यानंतरच चित्रपट नेमक्या कोणत्या दिवशी स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होईल, हे स्पष्ट होईल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts