Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शिरूरमध्ये सकाळी गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू, हल्लेखोरांचा शोध सुरू
गुन्हा

शिरूरमध्ये सकाळी गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू, हल्लेखोरांचा शोध सुरू

Shirur Crime News
5

शिरूर| सचिन धुमाळ, प्रतिनिधी

Shirur Crime News: शिरूर, पुणे | शिरूर शहरातील लाटेआळी (Shirur Firing) आणि आंबेडकर नगर परिसरात आज सकाळी गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत हरी गंगावणे या तरुणाचा गोळी लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. भरवस्तीत सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात गोळीबाराचा आवाज झाला. त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या उपस्थितीत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. (Shirur Pune News)

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून, पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी काही रिकामी काडतुसे आढळून आली असून ती जप्त करण्यात आली आहेत. गोळीबारात वापरण्यात आलेल्या शस्त्राचा प्रकार, हल्लेखोरांची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. (Shirur Breaking News)

हेही वाचा: काउंटडाऊन सुरू! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; विद्यार्थ्यांनी असे करा अभ्यासाचे नियोजन

हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत घटनेचे कारण निश्चितपणे सांगता येणार नाही.

गोळीबाराची घटना

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिरूर-अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

सध्याच्या घटनेनंतर शिरूर शहरात पोलिसांची गस्त आणि तपासाची कार्यवाही वाढवण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू असून, अधिकृत तपशील तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts