Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य, पण त्यातील १ मोदक मिठाचा का? काय आहे या मागचं रंजक कथा आणि परंपरा
लाईफस्टाईल

गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य, पण त्यातील १ मोदक मिठाचा का? काय आहे या मागचं रंजक कथा आणि परंपरा

Ganpati 21 Modak
170
Ganpati 21 Modak: गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. पण या २१ मोदकांपैकी एक मोदक मिठाचा का ठेवला जातो? यामागे नेमकी कोणती रंजक कथा आणि परंपरा आहे, जाणून घेऊया.

गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाची आरास, पूजा, आरती आणि प्रसाद यामुळे घराघरात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. गणपतीच्या आवडत्या पदार्थांमध्ये मोदकाला विशेष स्थान असल्याचं मानलं जातं. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये पाहायला मिळते.

मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की गणपतीला अनेक ठिकाणी २१ मोदकांचाच नैवेद्य (Ganpati 21 Modak) का अर्पण केला जातो? आणि या २१ मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा ठेवण्यामागे नेमकं काय कारण आहे? २१ ही संख्या इतकी खास का मानली जाते? यामागे केवळ परंपरा आहे की त्याला काही धार्मिक आणि तात्त्विक संदर्भही आहेत? चला, जाणून घेऊया यामागची रंजक माहिती.

हेही वाचा: शिरूरमध्ये सकाळी गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू, हल्लेखोरांचा शोध सुरू

२१ या संख्येचा धार्मिक अर्थ काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू परंपरेतील एका अर्थानुसार २१ हा अंक मानवी शरीर आणि विश्वाशी संबंधित विविध घटकांचे प्रतीक मानला जातो. यामध्ये पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण, पाच महाभूते आणि मन अशा घटकांचा समावेश केला जातो.

पाच ज्ञानेंद्रिये

मानवाला बाह्य जगाचा अनुभव घेण्यासाठी पाच ज्ञानेंद्रियांची मदत होते. त्यात नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ यांचा समावेश होतो. गंध, ध्वनी, दृश्य, स्पर्श आणि चव यांचा अनुभव या इंद्रियांद्वारे घेतला जातो.

पाच कर्मेंद्रिये

मानवी शरीरातून विविध प्रकारची कार्ये घडवून आणणाऱ्या पाच कर्मेंद्रियांमध्ये वाणी, हात, पाय, पायू आणि उपस्थ यांचा उल्लेख केला जातो. या माध्यमातून व्यक्ती आपल्या दैनंदिन क्रिया पार पाडते.

पंचप्राण

भारतीय तत्त्वज्ञानात शरीरातील जीवनशक्तीशी संबंधित प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पाच प्राणांचा उल्लेख आढळतो. धार्मिक विधींमध्येही पंचप्राणांचा संदर्भ अनेकदा येतो.

पंचमहाभूते

सृष्टीच्या मूलभूत रचनेशी संबंधित पाच घटक म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. भारतीय तत्त्वज्ञानात या पंचमहाभूतांना विशेष महत्त्व आहे.

या सर्व घटकांसोबत मन धरल्यास एकूण संख्या 21 होते. त्यामुळे 21 मोदक किंवा 21 दुर्वा अर्पण करण्यामागे संपूर्ण शरीर, जीवनशक्ती आणि विश्वातील घटक देवाला समर्पित करण्याचा प्रतीकात्मक अर्थ जोडला जातो, अशी धार्मिक व्याख्या केली जाते.

२१ मोदकांपैकी एक मोदक मिठाचा ठेवण्याची प्रथा (Salt Modak Tradition)

२१ मोदकांपैकी एक मोदक मिठाचा ठेवण्याची प्रथा सर्वत्र गणेश चतुर्थीच्या नैवेद्यात आढळत नाही. ही परंपरा काही ठिकाणी मिठाची संकष्टी चतुर्थी किंवा संबंधित व्रताशी जोडली जाते. या व्रतामध्ये २१ मोदक तयार केले जातात आणि त्यापैकी एक मोदक मिठाचा (Ganesh Chaturthi Modak) असतो. व्रत करणारी व्यक्ती मोदक खात पुढे जाते. ज्या वेळी मिठाचा मोदक येतो, त्या वेळी व्रताची सांगता केली जाते, अशी धार्मिक मान्यता आहे. काही परंपरांमध्ये उरलेले मोदक गायीला अर्पण करण्याची पद्धतही सांगितली जाते. त्यामुळे या प्रथेचा संबंध विशिष्ट व्रताशी आहे, असे मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts