Major Rishabh Sambyal: मेजर ऋषभ सांभ्याल यांच्या Instagram वरील पेड सब्सक्रिप्शनची सध्या चर्चा आहे. 1,500 हुन अधिक सब्सक्रायबर आणि मासिक शुल्काच्या आधारे त्यांच्या संभाव्य कमाईचं गणित किती होतं, जाणून घ्या.
भारतीय लष्करातील सेवा, स्पेशल फोर्सेसमधील अनुभव आणि राष्ट्रपतींचे माजी एडीसी म्हणून ओळख असलेले मेजर ऋषभ सिंह संभ्याला आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील पेड सब्सक्रिप्शनमुळे त्यांच्या डिजिटल इनकम मॉडेलची चर्चा सुरू झाली आहे.
मेजर ऋषभ सिंह संभ्याल यांनी NDA आणि IMA मधून प्रशिक्षण घेतल्यानंतर भारतीय लष्करात सेवा बजावली. त्यांनी जाट रेजिमेंटच्या मार्चिंग तुकडीचे नेतृत्व केले होते. याशिवाय त्यांनी ‘4 PARA (Special Forces)’मध्येही सेवा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे एडीसी म्हणून काम केल्यानंतर ते निवृत्त झाले. लष्करी कारकिर्दीसोबतच त्यांचा फिटनेस, शिस्त, प्रेरणादायी विचार आणि वैयक्तिक अनुभवांशी संबंधित कंटेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो.
हेही वाचा: गणपतीला २१ मोदकांचा नैवेद्य, पण त्यातील १ मोदक मिठाचा का? काय आहे या मागचं रंजक कथा आणि परंपरा
Instagram Subscription म्हणजे काय?
Instagram वर कंटेंट क्रिएटर्सना आपल्या फॉलोअर्ससाठी पेड सब्सक्रिप्शन सुरू करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये युजर्स मासिक शुल्क भरून क्रिएटरचा काही विशेष कंटेंट आणि एक्सक्लूसिव्ह फीचर्स वापरू शकतात.
मेजर ऋषभ सिंह सांभ्याल यांच्या अकाऊंटवरही अशी सुविधा असल्याचे वृत्त आहे. 15 सप्टेंबरच्या उपलब्ध आकडेवारीनुसार 1,569 सब्सक्रायबर असल्याचे नमूद करण्यात आले होते.
मात्र ही संख्या कायमची नसते. नवीन सदस्य जोडले जाऊ शकतात आणि विद्यमान सदस्य आपले सब्सक्रिप्शन रद्दही करू शकतात.
महिन्याला किती शुल्क आकारले जाते?
उपलब्ध वृत्तानुसार, वापरल्या जाणाऱ्या डिव्हाइसच्या आधारावर सब्सक्रिप्शन शुल्क वेगवेगळे होते.
Android: 180 प्रति महिना
iPhone: 199 प्रति महिना
मात्र एकूण 1,500 हुन अधिक सदस्यांपैकी किती जण Android वापरतात आणि किती iPhone वापरतात, याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मासिक उत्पन्न निश्चित करणे शक्य नाही.
1,500 हुन अधिक सदस्य असल्यास गणित काय सांगते?
केवळ उदाहरण म्हणून सर्व 1,500 सदस्यांनी 180 शुल्क भरले असे गृहीत धरल्यास:
1,500× ₹180 = ₹2,70,000
म्हणजे सुमारे ₹2,70,000 लाख प्रति महिना.
त्याचप्रमाणे सर्व सदस्यांनी ₹199 शुल्क भरले असे गृहीत धरल्यास:
1,500× ₹199 = ₹2,98,500
म्हणजे सुमारे ₹2,98,500 लाख प्रति महिना.
या आधारावर वर्षभराचा साधा हिशोब केल्यास रक्कम अंदाजे ₹2,70,000 लाख ते ₹2,98,500 लाख दरम्यान येते.
ही मेजर ऋषभ यांची खरी कमाई समजायची का?
नाही. हा केवळ सब्सक्रायबर संख्या × मासिक शुल्क या सूत्रावर आधारित अंदाज आहे. त्यातून मेजर ऋषभ सिंह सांभ्याल यांचे प्रत्यक्ष उत्पन्न किंवा नफा ठरवता येत नाही.
प्लॅटफॉर्मकडून आकारले जाणारे शुल्क, कर, वेगवेगळ्या डिव्हाइसवरील दर आणि सब्सक्रायबर संख्येतील बदल यामुळे प्रत्यक्ष मिळणारी रक्कम वेगळी असू शकते. याशिवाय Instagram वरील इतर उत्पन्नाचे स्रोत असतील तर ते या गणनेत समाविष्ट नाहीत.



