Maharashtra SSC HSC Board Exam 2027: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाली आहे. HSC परीक्षा 8 फेब्रुवारीपासून, तर SSC परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चला तर जाणून घ्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखांसह महत्त्वाची माहिती.
SSC HSC Board Exam 2027: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी – मार्च २०२७ मध्ये राज्यातील नऊ विभागणीय मंडळांच्या माध्यमातून या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.
मंडळाच्या माहितीनुसार, बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ ते १६ मार्च २०२७ या कालावधीत घेतली जाणार आहे. त्यानंतर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ ते ११ मार्च २०२७ या कालावधीत ( SSC HSC Board Exam Timetable 2027 ) होईल.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
बारावीची परीक्षा 8 फेब्रुवारीपासून (Class 12 Board Exam)
इयत्ता बारावी अर्थात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षेला सोमवार, 8 फेब्रुवारी 2027 रोजी सुरुवात होणार आहे. लेखी परीक्षांचा शेवट मंगळवार, 16 मार्च 2027 रोजी होईल.
दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून (Class 10 Board Exam)
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) परीक्षा सोमवार, 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून गुरुवार, 11 मार्च 2027 रोजी संपणार आहे.
प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा कधी?
लेखी परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
बारावी: 20 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2027
दहावी: 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2027
या कालावधीत संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक व इतर मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
सविस्तर विषयवार वेळापत्रक नंतर जाहीर (SSC HSC Board Exam Timetable 2027)
सध्या मंडळाने परीक्षांच्या कालावधीची माहिती जाहीर केली असून प्रत्येक विषयाची परीक्षा कोणत्या दिवशी आणि कोणत्या सत्रात होईल, याचे सविस्तर वेळापत्रक पुढील टप्प्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी विषयवार अंतिम वेळापत्रकासाठी महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board Exam 2027) अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे. विभागीय मंडळांच्या संकेतस्थळांवरही परीक्षेशी संबंधित माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे
परीक्षांच्या तारखा आधीच स्पष्ट झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वेळापत्रक तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र नियोजन करून सराव परीक्षा, लेखनाचा सराव आणि मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास यावर भर देणे उपयुक्त ठरू शकते.







