Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 1 लाख द्या, TETचा पेपर घ्या! पण आधी तुमची मूळ कागदपत्रं आमच्याकडे द्या; पोलिसांच्या आरोपपत्रात मोठा खुलासा
एजुकेशन- जॉब

1 लाख द्या, TETचा पेपर घ्या! पण आधी तुमची मूळ कागदपत्रं आमच्याकडे द्या; पोलिसांच्या आरोपपत्रात मोठा खुलासा

Maharashtra TET Paper Leak
0
Maharashtra TET Paper Leak: महाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरणात धक्कदायक माहिती समोर आली आहे. तब्बल १ लाख रुपयांपर्यंत पेपर विकला जात होता आणि त्याआधी उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतली जात असल्याचा खुलासा पोलिसांच्या आरोपपत्रातून झाला आहे.

TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने (Maharashtra TET Paper Leak ) आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. लीक झालेली प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी उमेदवारांकडून तब्बल 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात होती. विशेष म्हणजे, पैसे घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांची हमी (TET Paper Selling) म्हणून मागणी केली जात असल्याचे तपासातून समोर आले आहे.

हेही वाचा: मंगळ कर्क राशीत दाखल; ‘या’ ६ राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत मिळू शकतात सकारात्मक संकेत

3,500 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल (TET Chargesheet)

ठाणे शहर पोलिसांनी या प्रकरणात सुमारे 3,500 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रातून पेपरफुटीच्या संपूर्ण व्यवहाराची पद्धत समोर आली आहे. पेपर खरेदी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जात होती. मात्र, पेपर प्रत्यक्ष परीक्षेत तोच आला असल्याची खात्री झाल्यानंतरच विद्यार्थ्यांनी पैसे देण्याचे ठरवले होते.

यामुळे पेपर विकणाऱ्या आरोपींसमोर पैसे न मिळण्याचा धोका निर्माण झाला होता. हा धोका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या मूळ गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे जमा करून घेतली जात होती. ही कागदपत्रे एजंटच्या माध्यमातून पेपर विकणाऱ्या आरोपींपर्यंत पोहोचवली जात होती.

26 विद्यार्थ्यांची कागदपत्रे जप्त

पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, अटक करण्यात आलेल्या प्रकाश पवारने दिल्लीमध्ये फरार आरोपी अशोककुमार साओची भेट घेतली होती. यावेळी 26 विद्यार्थ्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे त्याच्याकडे देण्यात आली. पुढील तपासात ही कागदपत्रे अन्य एका आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आली.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परीक्षा झाल्यानंतर पेपर लीक झालेला प्रश्नपत्रिकेशी जुळतो की नाही, हे विद्यार्थी आणि एजंट तपासत होते. पेपर जुळल्यास ठरलेली रक्कम देण्यात येत होती. त्यानंतरच विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे परत केली जात होती. TET Breaking News

18 आरोपींवर आरोपपत्र तर 16 जणांना अटक

28 जून रोजी होणारी TET परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. परीक्षेच्या दोन दिवस आधीच प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात ठाणे शहर पोलिसांनी एकूण 18 आरोपींची नावे आरोपपत्रात नमूद केली असून, त्यापैकी 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

तपासातील सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आग्रा येथील महिम पत्रन प्रिंटिंग प्रेसमधून ही प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी प्रश्नपत्रिका चक्क चपलांमध्ये लपवून बाहेर नेल्याचे तपासात समोर आले आहे. Maharashtra Education News

कोचिंग क्लासच्या माजी शिक्षकावर सूत्रधार असल्याचा आरोप

पोलिसांनी बिजेंद्र गुप्ता याला या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे. गुप्ता याने यापूर्वी कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम केले होते. त्याच्याविरोधात यापूर्वीही अशाच स्वरूपाची प्रकरणे असल्याचे पोलिसांच्या तपासात नमूद करण्यात आले आहे. Teacher Recruitment Scam

दरम्यान, आरोपींचे वकील शैलेश गायकवाड यांनी पोलिसांकडे आपल्या अशिलांविरोधात ठोस पुरावे नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणातील आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होतील किंवा नाही, हे पुढील सुनावणीदरम्यान स्पष्ट होणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts