• Home
  • महाराष्ट्र
  • वर्ग सुरू असतानाच शाळेच्या पोर्चचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी जखमी
गुन्हा

वर्ग सुरू असतानाच शाळेच्या पोर्चचा स्लॅब कोसळला; १३ विद्यार्थी जखमी

Solapur school slab collapse
5
Solapur school slab collapse: सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात वर्ग सुरू असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या पोर्चचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत १३ विद्यार्थी जखमी झाले असून, घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अक्कलकोट (Akkalkot news) तालुक्यातील बबलाद गावात जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. शाळेत विद्यार्थी उपस्थित असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली स्लॅबचा ढिगारा विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने १३ विद्यार्थी जखमी झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Solapur school slab collapse)

नेमकी घटना काय?

बबलाद गावातील सोलापूर (Solapur news) जिल्हा परिषदेच्या कन्नड माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची इमारत सुमारे २५ वर्षे जुनी आहे. दुपारच्या सुमारास विद्यार्थी शाळेत असतानाच पोर्चच्या स्लॅबचा काही भाग अचानक खाली कोसळली.

अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. स्लॅबचा काही भाग खाली उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने १३ विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

हेही वाचा: मुलीशी लग्न करणं पडलं महागात; कोल्हापुरात २५ वर्षीय तरुणावर POCSOचा गुन्हा, नेमकं काय घडलं?

जखमी विद्यार्थ्यांवर उपचार

अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.

जुन्या इमारतीमुळे दुर्घटना?

शाळेची इमारत जुनी असल्याने तिच्या बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्लॅबचा भाग नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, याची तपासणी करण्यात येत आहे.

या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जुन्या शाळांच्या इमारतींची तातडीने पाहणी करून धोकादायक भागांची दुरुस्ती करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

नवीन इमारतीची मागणी

घटनेची गंभीर दखल घेत पंचायत समिती सभापती सागर कल्याणशेट्टी यांनी संबंधित शाळेसाठी नवीन इमारत उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

रोहित पवार यांची प्रतिक्रिया

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळून १३ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित अशा दुर्घटनांमुळे शाळांच्या इमारतींच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जुन्या आणि जीर्ण शाळांच्या इमारतींची वेळोवेळी तपासणी आणि दुरुस्ती का होत नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts