Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • TET पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन उघड; खासगी प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक, आरोपींची संख्या 16 वर
महाराष्ट्र

TET पेपरफुटीचे सोलापूर कनेक्शन उघड; खासगी प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक, आरोपींची संख्या 16 वर

TET Paper Leak
11
TET Paper Leak: TET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता सोलापूरपर्यंत पोहोचला आहे. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालक प्रकाश पवार याला अटक करण्यात आली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणाचा तपास आता महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत ((Solapur Connection) पोहोचला आहे. या प्रकरणात खासगी पोलीस प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाने सोलापुरात ही कारवाई केली असून, या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या आता १६ वर पोहोचली आहे.

हेही वाचा: पुणे महापालिकेच्या रस्ते कामाचा दर्जा पुन्हा चव्हाट्यावर; शनिवार पेठेत सिलेंडर बसेल एवढा मोठा खड्डा

कुमठे गावातून प्रकाश पवार ताब्यात

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश पवार सोलापुरातील (Solapur Connection) कुमठे गावात ‘ध्रुव प्रतिष्ठान’ नावाने खासगी प्रशिक्षण केंद्र चालवत होता. मागील सुमारे 15 ते 20 वर्षांपासून तो पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती आहे.

TET पेपरफुटी प्रकरणात (TET Paper Leak) यापूर्वी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या संपर्कात प्रकाश पवार असल्याचे तपासात समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्याने संबंधित आरोपींपर्यंत पोहोचवल्याचाही पोलिसांना संशय आहे.

मात्र, ही कागदपत्रे नेमकी कोणत्या कारणासाठी देण्यात आली होती आणि त्याचा TET पेपरफुटीशी प्रत्यक्ष संबंध काय आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

संस्थेतून कागदपत्रे आणि पुरावे तपासणार

TET प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर (TET Paper Leak) भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासाची व्याप्ती महाराष्ट्राबाहेरही वाढवण्यात आली होती. यापूर्वी दिल्ली, आग्रा आणि बिहारमधून काही संशयितांना अटक करण्यात आली होती.

तपासादरम्यान महाराष्ट्रातील काही व्यक्तींचे या प्रकरणाशी संबंध असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. त्यातून प्रकाश पवार याचे नाव समोर आल्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर अटक करण्यात आली.

पोलिसांकडून प्रकाश पवारच्या प्रशिक्षण संस्थेतील कागदपत्रे आणि इतर संभाव्य पुरावे तपासले जात आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

TET परीक्षा रद्द (TET Paper Leak)

भिवंडी (Bhiwandi Police) येथे TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास भिवंडी पोलिसांच्या विशेष पथकाकडे सोपवण्यात आला.

या प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार विजेंद्र गुप्ता याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान देशातील विविध भागांमध्ये कारवाई करत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. आता सोलापूर कनेक्शन समोर आल्याने या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts