Mumbai Bank Bomb Threat : मुंबईतील बँकांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांकडून ई-मेलचा तपास सुरू आहे.
मुंबईत बॉम्बस्फोटाच्या धमकीने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या धमकीमध्ये बँकांसह मुंबई विमानतळ, महापौर कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Security Alert)
पंजाब नॅशनल बँकेलाही धमकीचा ई-मेल
समोर आलेल्या माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील झोनल कार्यालयासह झवेरी बाजार येथील शाखेला आणि क्राइम ब्रँचला धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. या ई-मेलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे संबंधित परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. (Bank Bomb Threat Email)
पोलिसांकडून तपासणी; संशयास्पद वस्तू आढळली नाही
धमकीचे ई-मेल मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या मदतीने परिसराची तपासणी करण्यात आली. दरम्यान, तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे वृत्त आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासह या धमकीमागील नेमके कारण तपासले जात आहे. या घटनेमुळे मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. धमकीचा ई-मेल कोणी पाठवला आणि त्यामागे नेमका काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करत आहेत. (Mumbai Police Investigation)
हेही वाचा : Maharashtra Court Bomb Threat : परभणी, सातारा, पुणे, पंढरपूरसह अनेक न्यायालयांना धमकीचे ई-मेल; प्रशासन सतर्क









