- स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबईने देशातील ४,७५१ शहरांमध्ये पहिला क्रमांक मिळवल्याची माहिती समोर आली आहे. (1st Price)
- शहरातील स्वच्छता व्यवस्थापन, कचरा संकलन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे नवी मुंबईची कामगिरी चर्चेत आली आहे. (Environment friendly city)
- या यशामुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या शहरी स्वच्छता उपक्रमांची दखल घेतली जात आहे. (National leveal)
Swachh Survekshan 2025-26 मध्ये नवी मुंबईने देशातील ४,७५१ शहरांमध्ये पहिला क्रमांक पटकावल्याची माहिती आहे. स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्राचा मान उंचावणारी ही कामगिरी नेमकी कशी साध्य झाली, जाणून घ्या.
महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशातील शहरांच्या स्वच्छतेचे मूल्यांकन करणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवी मुंबईने अव्वल स्थान मिळवले आहे. देशभरातील ४,७५१ शहरांचा सहभाग असलेल्या या सर्वेक्षणात नवी मुंबईने गुजरातमधील सुरत आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा यांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला. ११ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. (droupadi murmu)
स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई ठरली अव्वल
स्वच्छ भारत मिशन-नागरी अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणातून देशातील शहरांच्या स्वच्छता व्यवस्थेचा आणि कचरा व्यवस्थापनाचा आढावा घेतला जातो. यंदाच्या सर्वेक्षणात नवी मुंबईने उल्लेखनीय कामगिरी केली. विशेष म्हणजे ‘सुपर स्वच्छ लीग’ या श्रेणीत नवी मुंबईने पहिला क्रमांक मिळवला आहे. गुजरातमधील सुरत दुसऱ्या, तर आंध्र प्रदेशातील विजयवाडा तिसऱ्या स्थानावर आहे. मागील वर्षी नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर होती. यंदा दोन स्थानांची झेप घेत शहराने अव्वल स्थान मिळवले. (swachha bharat)
अहमदाबाद आणि इंदूरलाही मानांकन
यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात ‘स्वच्छ शहर जोडी’ या मेंटर-मेंटी श्रेणीचाही समावेश होता. यामध्ये गुजरातमधील अहमदाबाद आणि साणंद या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला. इंदूर आणि देपालपूर या जोडीने दुसरे, तर तिरुपती आणि कुप्पम या जोडीने तिसरे स्थान पटकावले. (Ahmadabad indoor)
नवी मुंबईच्या यशामागे काय?
शहरातील कचरा संकलन, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे या बाबींवर नवी मुंबई महानगरपालिकेने भर दिला. स्वच्छता मोहिमांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वच्छता व्यवस्थेवर देखरेख ठेवणे यांसारख्या उपाययोजनांचाही या कामगिरीत महत्त्वाचा वाटा आहे.
या यशामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि शहरातील नागरिकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. नवी मुंबईने मिळवलेले हे यश केवळ महानगरपालिकेपुरते मर्यादित नसून सामूहिक प्रयत्नांतून शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवता येऊ शकते, याचे उदाहरण ठरले आहे. (Garbage management)








