राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ते रुग्णालयात गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहितीची प्रतीक्षा आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज (१२ नोव्हेंबर) पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. नियमित आरोग्य तपासणीसाठी ते रुग्णालयात गेल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि त्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.
गेल्या आठवड्यात खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर ७ नोव्हेंबर रोजी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता ते पुन्हा नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नसून ही पूर्वनियोजित नियमित तपासणी आहे. त्यांच्या आरोग्याबाबत पुढील अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.









