Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १ रुपयाची, तर चांदीच्या दरात १०० रुपयांची घट झाली. जाणून घ्या आजचा १० ग्रॅम सोन्याचा आणि चांदीचा भाव.
दिवाळीनंतर आता लग्नसराईचे वेध लागले आहेत. अशा परिस्थितीत सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू असून, आज १३ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १ रुपयाची, तर चांदीच्या दरात प्रति किलो १०० रुपयांची घट झाल्याची माहिती आहे. (Gold Silver Price)
सोन्याच्या दरात किती घट?
आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १३,९७९ रुपये, तर १० ग्रॅमसाठी १,३९,७९० रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत प्रति ग्रॅम १ रुपयाची घट झाली आहे. दुसरीकडे, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १२,८१४ रुपये असून, १० ग्रॅमसाठी ग्राहकांना १,२८,१४० रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे, काल सोन्याच्या दरात सुमारे २,००० रुपयांची घसरण झाल्याची नोंद होती. त्या तुलनेत आजची घसरण मर्यादित असली तरी सोन्याच्या किमतीतील बदलांकडे ग्राहक आणि सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. (Gold Rate Today)
चांदीच्या दरातही घसरण; खरेदीदारांना दिलासा?
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव प्रति किलो १,८५,३८५ रुपयांच्या आसपास असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याने बाजारातील परिस्थितीवर ग्राहकांचे लक्ष आहे. दिवाळीचा सण संपल्यानंतर आता लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे दागिन्यांच्या खरेदीसाठी अनेक कुटुंबांकडून तयारी केली जात आहे. अशा वेळी सोन्या-चांदीच्या दरात होणारी घसरण ग्राहकांसाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरू शकते. (Gold- Silver Rate in India)
लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दरातील बदल महत्त्वाचे
भारतीय बाजारपेठेत लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. लग्नातील दागिने, भेटवस्तू आणि पारंपरिक खरेदीसाठी अनेक जण सोने-चांदीला प्राधान्य देतात. त्यामुळे दरातील अगदी छोट्या बदलाचाही ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. (Festive Session)
गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय घडामोडी, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि बाजारातील अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. आता दरात काही प्रमाणात घसरण होत असल्याने ग्राहकांसह सराफा बाजारातील व्यावसायिकही पुढील बदलांकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र, दागिने खरेदी करताना केवळ सोन्या-चांदीचा मूळ दर न पाहता त्यावर आकारले जाणारे जीएसटी आणि घडणावळ शुल्कही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. (Market Uncertainty)









