- दिवाळी पाडव्याच्या दिवशी २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत?
- मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरूमधील आजचे भाव पाहा.
- १ ग्रॅम आणि १० ग्रॅम सोन्याच्या किमतींची तुलना करून खरेदीचे नियोजन करा.
Gold-Sliver Rate Today : दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, १० नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात किंचित घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. विशेषतः दागिने, सोन्याची नाणी आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांचे लक्ष आजच्या दरांकडे लागले आहे. (Gold Rate in Mumbai Pune)
MCX वर सोन्याच्या दरात घसरण
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या वायदा दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा वायदा भाव ०.०४ टक्क्यांनी म्हणजेच ६० रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम १,४३,१०६ रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, बुलियन बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४३,६४० रुपये नोंदवण्यात आला. (24 Carat Gold Rate)
सोन्याच्या दरातील ही घसरण मर्यादित असली तरी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ती महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली, डॉलरचा दर आणि मागणी-पुरवठा यांमुळे सोन्याच्या किमतीत दिवसभर बदल होऊ शकतात. (22 Carat Gold Rate)
दिवाळी पाडव्याला सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग
दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने, चांदी, नवीन वस्तू आणि दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सराफा बाजारात या काळात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने आज खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. (Gold Price Today)
| शहर | २४ कॅरेट १ ग्रॅम | २४ कॅरेट १० ग्रॅम | २२ कॅरेट १ ग्रॅम | २२ कॅरेट १० ग्रॅम |
|---|---|---|---|---|
| मुंबई | ₹१४,६२४ | ₹१,४६,२४० | ₹१३,३९५ | ₹१,३३,९५० |
| पुणे | ₹१४,६२८ | ₹१,४६,२८० | ₹१३,३९९ | ₹१,३३,९९० |
| चेन्नई | ₹१४,६५२ | ₹१,४६,५२० | ₹१३,४२१ | ₹१,३४,२१० |
| बंगळुरू | ₹१४,६४३ | ₹१,४६,४३० | ₹१३,४१३ | ₹१,३४,१३० |
| शहर | १ ग्रॅम | १० ग्रॅम |
|---|---|---|
| मुंबई | ₹१९१.५५ | ₹१,९१५.५१ |
| पुणे | ₹१९१.६८ | ₹१,९१६.७६ |
| चेन्नई | ₹१९१.६५ | ₹१,९१६.५१ |
| बंगळुरू | ₹१९१.७१ | ₹१,९१७.११ |
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त!
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजच्या बाजारातील घसरण महत्त्वाची ठरली आहे. उपलब्ध सकाळच्या बाजार संदर्भ दरानुसार सोन्याच्या १० ग्रॅमच्या दरात मागील बंद भावाच्या तुलनेत १,०२९ रुपयांची, तर चांदीच्या किलोच्या दरात २,१३२ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळू शकतो (Gold-Sliver Rate Today)
सोने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा
- दागिने खरेदी करताना BIS हॉलमार्क आणि HUID क्रमांक तपासा.
- २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरातील फरक समजून घ्या.
- अंतिम किमतीत घडणावळ आणि GST यांचा समावेश होतो का, हे तपासा.
- खरेदी केल्यानंतर पक्के बिल घेण्यास विसरू नका.








