Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ३१ ऑगस्टच्या धमकीने नागपूर हादरलं; १८ शाळांना बॉम्बची धमकी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आज शाळा बंद
महाराष्ट्र

३१ ऑगस्टच्या धमकीने नागपूर हादरलं; १८ शाळांना बॉम्बची धमकी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आज शाळा बंद

Nagpur School Bomb Threat
25
Nagpur School Bomb Threat: नागपूर शहरातील तब्बल १८ नामाकिंत शाळांना बॉम्ब बॉम्बस्फोटाची धमकीचा ई-मेल आल्याने खळबळ उडाली आहे. धमकीमध्ये ३१ ऑगस्टचा उल्लेख असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

नागपूर शहरातील १८ नामांकित शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी (Nagpur School Bomb Threat) मिळाल्यानंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर आज खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळा बंद (Nagpur Schools School Closed) ठेवण्यात आल्या असून, शाळांच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार खास! संकष्टी चतुर्थी अन् श्रावणी सोमवार एकत्र; ‘या’ 5 राशींना मिळू शकतो शुभ संकेत

धमकीच्या ई-मेलनंतर प्रशासन सतर्क

१९ ऑगस्ट रोजी नागपुरातील (Nagpur Latest News) काही प्रमुख शाळांना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला संशयास्पद ई-मेल प्राप्त झाला होता. या संदेशातून संबंधित ठिकाणी स्फोट घडवून (bomb threat Nagpur schools) आणण्याची धमकी देण्यात आली होती. ई-मेलमध्ये ३१ ऑगस्ट या तारखेचा उल्लेख असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून शाळा व्यवस्थापनाने आज शाळांना सुट्टी (Nagpur Schools School Closed) देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पालकांमध्येही या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी

धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने संबंधित शाळांमध्ये तपासणी सुरू केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शाळांच्या इमारतींसह परिसराची पाहणी केली. प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

धमकीचा ई-मेल नेमका कोठून आणि कोणी पाठवला, याचा तपास सध्या सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार ई-मेलचे कनेक्शन बांगलादेश आणि फ्रान्सशी असल्याचे तपासात समोर आले आहे.

शाळा आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बंदोबस्त

धमकीमध्ये नमूद केलेली तारीख आज असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही शक्यता दुर्लक्षित न करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित शाळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

धमकीचा ई-मेल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणामागे नेमके कोण आहे आणि धमकी कितपत गंभीर आहे, याचा उलगडा तपासानंतर होणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts