Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार भेट
महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस; सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार भेट

Manoj Jarange Patil Hunger Strike
33
Antarwali Sarati, Maharashtra || Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचालींना वेग आला असून, आज मंत्र्यांचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil latest news) यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस (Jarange Patil hunger strike day 3) आहे. आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि आंदोलकांची मोठी उपस्थिती पाहता राज्य सरकारनेही चर्चेच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आज सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार खास! संकष्टी चतुर्थी अन् श्रावणी सोमवार एकत्र; ‘या’ 5 राशींना मिळू शकतो शुभ संकेत

कोण कोण भेट घेणार?

या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई तसेच आमदार प्रसाद लाड यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. (Government Delegation Meeting) मराठा आरक्षणासह आंदोलनातील इतर मागण्यांबाबत सरकारची भूमिका या चर्चेत स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतल्याने सरकारसमोर तोडगा काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आजची भेट केवळ औपचारिक न राहता ठोस चर्चेची ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Politics latest News)

मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी

दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधवांची गर्दी (Antarwali Sarati protest) कायम असून, राज्यातील विविध जिल्ह्यांतून आंदोलक आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत. (Maharashtra News)

रात्री मनोज जरांगेच्या प्रकृतीची तपासणी

उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. आंदोलनस्थळी वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. (Maratha Reservation)

मंत्री उदय सामंत यांनी घेतली भेट

यापूर्वी मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आजच्या चर्चेत सरकार कोणता प्रस्ताव मांडते आणि त्यावर जरांगे पाटील यांची भूमिका काय राहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकार आणि आंदोलक यांच्यातील चर्चेतून तोडगा निघतो की आंदोलन आणखी तीव्र होते, याचे उत्तर आजच्या घडामोडींनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts