Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शारीरिक संबंधांपूर्वी होणारा नवरा औषध देणार असल्याचं आईला सांगितलं; काही तासांत 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू!
गुन्हा

शारीरिक संबंधांपूर्वी होणारा नवरा औषध देणार असल्याचं आईला सांगितलं; काही तासांत 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू!

Baramati News
18
Baramati News: बारामतीत 23 वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. प्रियकरासोबत शारीरिकसंबंध ठेवण्यापूर्वी तिने आईला फोन करून औषध देणार असल्याचं सांगितल्याचा दावा आहे. मात्र, काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना बारामतीतून बातमी समोर आली आहे. 23 वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तिचा प्रियकर अथर्व राजेंद्र मेहन याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत्यूपूर्वी काही तास आधी तरुणीने आईशी फोनवर संवाद साधला होता. यावेळी अथर्व आपल्याला गोळी देणार असल्याचं तिने सांगितल्याचा दावा तिच्या आईने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. (Baramati woman death)

हेही वाचा: जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर फाडले; मराठा समाज आक्रमक, कराडमध्ये रास्ता रोको

6 ऑगस्ट रोजी तरुणी अथर्वसोबत बाहेर गेली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास तिची प्रकृती अचानक बिघडली. तिला उपचारासाठी बारामतीतील विविध रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तरुणीच्या आईने अथर्ववर संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तरुणीच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तिला कोणतं औषध किंवा गोळी देण्यात आली होती का, देण्यात आली असल्यास त्याचा मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

मृत्यूच्या काही दिवस आधीपासून बदललं होतं वर्तन? ( Baramati News )

पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या सुमारे 15 ते 20 दिवस आधी तरुणी नेहमीपेक्षा शांत आणि गप्प राहत असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं होतं. याबाबत आईने तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली होती.

मैत्रिणीने अथर्वकडून तरुणीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला जात असल्याचं तसेच तिला काही गोळ्या दिल्या जात असल्याचं सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या माहितीमुळे कुटुंबीयांचा संशय अधिक बळावला.

6 ऑगस्टला दिवसभर काय घडलं?

तक्रारीनुसार, 6 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अथर्व कारमधून तरुणीला टी.सी. कॉलेज, बारामती येथे घेऊन गेला होता. एमबीए प्रवेशासंदर्भातील कामासाठी ती त्याच्यासोबत गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

दुपारी सुमारे चार वाजता तरुणीने आईला मेसेज करून प्रवेश शुल्कासंदर्भात माहिती दिली. तसेच अथर्वच्या आई आणि मावशीला सोडण्यासाठी ते जात असल्याचं तिने सांगितलं होतं.

यानंतर आईने व्हिडिओ कॉल केला असता तरुणी अथर्वसोबत कारमध्ये असल्याचं दिसलं. आईने तिला लवकर घरी येण्यास सांगितलं.

सायंकाळी सातच्या सुमारास आईने मुलीला फोन केला. मात्र, फोन न उचलल्याने तिने अथर्वच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी आईचं मुलीशी बोलणं झालं. या संभाषणात अथर्व तिला आपल्या घरी घेऊन जाणार असून त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो तिला गोळी देणार असल्याचं मुलीने सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

आईने तिला अथर्वसोबत जाऊ नये आणि तातडीने घरी परत यावं, असं सांगितल्याचंही तक्रारीत नमूद आहे.

दोन्ही कुटुंबीयांना लग्नाची माहिती होती

मृत तरुणीने बीएस्सी अ‍ॅग्रीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर ती एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये तिच्या मैत्रिणीकडून आईला अथर्वसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली होती.

यानंतर कुटुंबीयांनी तरुणीशी चर्चा केली. अथर्वसोबत विवाह करण्याची इच्छा असल्याचं तिने सांगितल्याचा दावा तक्रारीत आहे. पुढे दोन्ही कुटुंबीयांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली आणि एप्रिल 2026 मध्ये अथर्वच्या बारामती येथील घरीही दोन्ही कुटुंबीयांची भेट झाली होती.

दोन्ही बाजूंच्या संमतीने विवाह करण्याचं ठरल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यानंतर अथर्व आणि तरुणी एकमेकांच्या संपर्कात असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: पुणे महापालिकेच्या रस्ते कामाचा दर्जा पुन्हा चव्हाट्यावर; शनिवार पेठेत सिलेंडर बसेल एवढा मोठा खड्डा  

गोळी नेमकी कोणती?

तरुणीला नेमकं कोणतं औषध किंवा गोळी देण्यात आली होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या औषधाचा तिच्या प्रकृतीवर परिणाम झाला का आणि त्याचा मृत्यूशी काही संबंध आहे का, हे तपासाचा महत्त्वाचा भाग आहे.

पोलिसांकडून वैद्यकीय अहवाल, रासायनिक तपासणी, डिजिटल आणि तांत्रिक पुरावे तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत मृत्यूमागील कारणाबाबत कोणताही अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही.

दरम्यान, तरुणीच्या आईने अथर्ववर गंभीर संशय व्यक्त करत त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीच्या आधारे बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

तपासादरम्यान समोर येणारे वैद्यकीय, रासायनिक आणि इतर पुरावे या प्रकरणातील मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts