Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • घोडेगावमध्ये लग्नाच्या नावाखाली ४० हजारांची फसवणूक? विवाहानंतर नववधूला नेल्याची फिर्याद
गुन्हा

घोडेगावमध्ये लग्नाच्या नावाखाली ४० हजारांची फसवणूक? विवाहानंतर नववधूला नेल्याची फिर्याद

Ghodegaon Marriage Fraud Case
13

निलम चापुडे | जुन्नर प्रतिनिधी 

Ghodegaon Marriage Fraud Case : घोडेगावमध्ये लग्नाच्या आमिषाने ४० हजारांची फसवणूक केल्याचा आरोप; नवविवाहित महिलेला घेऊन गेल्याची फिर्याद ग्रामीण भागातही लग्नाच्या नावाने फसवणुकीची जिहादी टोळी सक्रिय…!!

मुलाच्या लग्नासाठी मुलगी शोधत असताना मध्यस्थ महिलांच्या माध्यमातून विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली ४० हजार रुपये घेतल्याची आणि लग्नानंतर नवविवाहित महिलेला सोबत घेऊन गेल्याची फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याची फिर्याद ( Marriage Fraud Case )

पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सुयोधन गणपत काळे (वय ७०) हे पत्नी व मुलासह राहतात. त्यांचा मुलगा स्वप्निल काळे (वय ३५) याच्यासाठी ते विवाहयोग्य मुलगी शोधत होते. याचदरम्यान त्यांच्या ओळखीच्या नसिम शहाबुद्दीन मुंडे या महिलेने अमिना जमालुद्दीन सय्यद यांच्या माध्यमातून मुलगी दाखविण्याबाबत सांगितल्याचा आरोप आहे.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मुलगी दाखविण्याच्या प्रक्रियेसाठी सुरुवातीला ५ हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यात आले. त्यानंतर मुलीचा फोटो दाखविण्यात आला आणि विवाह निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. दिनांक ८ मार्च २०२६ रोजी घोडेगाव येथील हरिश्चंद्र मंदिरात स्वप्निल काळे याचा संबंधित मुलीशी विवाह झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. विवाहाच्या वेळी आणखी ३५ हजार रुपये दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Child Abuse Case Verdict : डोंगराळे चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणात न्यायाचा विजय! आरोपीला फाशीची शिक्षा; उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादाला

८ मार्चला विवाह; दुसऱ्याच दिवशी नववधूला नेल्याचा आरोप

मात्र, विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ९ मार्च २०२६ रोजी नसिम मुंडे व अमिना सय्यद या घरी आल्या आणि संबंधित महिलेला सोबत घेऊन गेल्या, असा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर संबंधित महिलेला परत आणण्याबाबत तसेच दिलेले पैसे परत मिळविण्याबाबत विचारणा केली असता पैसे परत देण्यास नकार देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली एकूण ४० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत सुयोधन काळे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.पोलिसांकडून तपास सुरू.

फिर्यादीच्या जबाबानुसार, प्रकरणात गुन्हा नोंदवून तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार तनाश्री लक्ष्मण घोडे यांच्याकडे देण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts