अमोल धर्माधिकारी, Pune Westin Beuro Head
Pune PMC Road Quality: पुणे महापालिकेच्या रस्ते कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाजवळील रस्त्याचा मोठा भाग खचून सिलेंडर बसेल एवढा भला मोठा खड्डा पडल्याचे समोर आले आहे.
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) रस्ते कामांच्या दर्जावर (Pune road collapse) पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवार पेठेतील (Shaniwar Peth) मुठेश्वर मंडळाजवळ रस्त्याचा भाग अचानक खचल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर सिलेंडर (gas cylinder) बसेल एवढा भला मोठा खड्डा पडला. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानंतर परिसरातील रिसरातील रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा सुरू झाली आहे. वरून रस्ता व्यवस्थित दिसत असला तरी त्याची प्रत्यक्ष मजबुती किती आहे. असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा: सिंहगड रोडवर मध्यरात्री राडा! हत्यारं घेऊन आलेल्या टोळक्याने 7 ते 8 वाहनांची तोडफोड; नेमकं काय घडलं?
रस्ता अचानक खचला
शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाजवळील रस्त्यावर (Shaniwar Peth Road Collapse) हा प्रकार घडला. रस्त्याचा भाग अचानक खचल्याने या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. विशेष म्हणजे, या खड्ड्यात सिलेंडर बसेल एवढी जागा तयार झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाची मजबुती आणि कामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. (Pune latest news)
महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
शहरातील रस्त्यांच्या कामासाठी लाखो-कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, रस्ता तयार झाल्यानंतर काही काळातच अशा प्रकारे खचत असेल, तर संबंधित कामाची गुणवत्ता तपासली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्याची ही अवस्था पाहता पुणे महापालिकेच्या कामाचा दर्जा आणि ठेकेदारांच्या कामावर प्रशासनाचा असलेला अंकुश याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. रस्ते बांधकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळत नसतील, तर या निकृष्ट कामाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता पुणेकरांकडून केला जात आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा नजरेस न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या ठिकाणी पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









