Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यात पहाटेपर्यंत पार्टी भोवली! ‘द हाऊज कम्युन’ पबवर पोलिसांची धाड, ८ जणांना अटक
Pune

पुण्यात पहाटेपर्यंत पार्टी भोवली! ‘द हाऊज कम्युन’ पबवर पोलिसांची धाड, ८ जणांना अटक

Pune Pub Raid

Pune Pub Raid : पुण्यात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील ‘द हाऊज कम्युन’ पबमध्ये पहाटे ३.३० वाजेपर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात दारू आणि साउंड सिस्टिम जप्त केली आहे.

‘द हाऊज कम्युन’ पबवर पहाटे पोलिसांची धाड ( Pune Pub Raid )

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पहाटे साडेतीनच्या सुमारास ‘द हाऊज कम्युन’ पबमध्ये छापेमारी केली. पबमध्ये निर्धारित वेळेच्या पुढे पार्टी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.छापेमारीच्या वेळी पबमध्ये तब्बल ८९ ग्राहक उपस्थित होते. यामध्ये ६३ पुरुष आणि २६ महिलांचा समावेश होता. नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये सुमित रोहिदास गोटे, नूर हुसेन शेख, सोनाली विलास पंडित, मंगेश उत्तम धिमधिमे, अनिकेत निवृत्ती मांडकीकर, सुनीता जैन वर्मा, अनंत जगत गायकेवाड आणि शहनूर अमीनुद्दीन काझी यांचा समावेश आहे.पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : भारताच्या कसोटी संघासमोर श्रीलंकेचे आव्हान; गौतम गंभीर म्हणाले, आम्ही पूर्णपणे…..

दारू आणि साउंड सिस्टिम जप्त ( Pune Pub Raid )

पोलिसांच्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी अंदाजे १ लाख ६७ हजार रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. तसेच सुमारे ७५ हजार रुपये किमतीची साउंड सिस्टिम देखील पोलिसांनी ताब्यात घेतली.या कारवाईत एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे २ लाख ४२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या पब, बार आणि इतर आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पहाटेपर्यंत नियमबाह्य पद्धतीने पार्टी किंवा व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, ‘द हाऊज कम्युन’ पबवरील या कारवाईनंतर पुण्यातील इतर पब आणि बारमध्येही पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts