अमोल धर्माधिकारी, Pune Westin Beuro Head
Sinhagad Road Pune: पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना समोर आली आहे. सिंहगड रॉड परिसरातील एका सोसायटीमध्ये काही तरुणांनी वाहनांनी तोडफोड केल्याची घटना घडली. हातात हत्यारे घेऊन आलेल्या या व्यक्तींनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सात ते आठ चारचाकी वाहनांचे नुकसान केल्याची माहिती आहे.
मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सिंहगड रोडवरील (Sinhagad Road Pune) सुयोग श्री सोसायटीमध्ये (Suyog Shree Society) ही घटना घडली. मध्यरात्री २ च्या (midnight vandalism) सुमारास काही तरुण परिसरात गोंधळ घालत पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या हातात हत्यारे असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेत अनेक वाहनांच्या काचा आणि इतर भागांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा: मोदी, शाह, राहुल गांधी एकाचवेळी रिसेप्शनमध्ये; सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या सोहळ्याचे फोटो व्हायरल
नेमकं कारण काय?
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड (Sinhagad Road Pune) पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तोडफोड करणाऱ्या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले (CCTV investigation) जात असल्याची माहिती आहे. घटनेमागील नेमके कारण काय होते, याचाही तपास केला जात आहे.
वाहनांची तोडफोड
दरम्यान, संबंधित व्यक्तींनी यापूर्वीही अशाच प्रकारे वाहनांची तोडफोड केल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ वाहनांच्या नुकसानीपुरता मर्यादित नसून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, याचा तपासही पोलिसांसमोर महत्त्वाचा ठरणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुणे शहरातील (Pune City) विविध भागांत वाहनांची तोडफोड, मारामारी आणि दहशत निर्माण करण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे हत्यारे घेऊन फिरणाऱ्या आणि नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
या प्रकरणात पोलिसांकडून CCTV फुटेजनुसार संशयित व्यक्तींचा शोध सुरू असून, या घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.








