Breaking News :
  • Home
  • फूड
  • Diwali FDA Action : दिवाळीच्या मिठाईवर FDA ची करडी नजर! खवा-मावा, काजू-बदामासह १७.८२ टन साठा जप्त
महाराष्ट्र

Diwali FDA Action : दिवाळीच्या मिठाईवर FDA ची करडी नजर! खवा-मावा, काजू-बदामासह १७.८२ टन साठा जप्त

Diwali FDA Action
21
Diwali FDA Action : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळ आणि असुरक्षित खाद्यपदार्थांविरोधात तपासणी मोहीम तीव्र केली आहे. खवा, मावा, काजू, बदाम यांसह तब्बल १७.८२ टन साठा जप्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात मिठाई आणि फराळ खरेदी करताना ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या सविस्तर. (Adulterated Sweets)

दिवाळीच्या काळात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांची मागणी वाढली असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) भेसळयुक्त आणि असुरक्षित खाद्यपदार्थांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई महानगर प्रदेशातील ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, भिवंडी आणि वसई परिसरात तपासणी करत खवा, मावा, काजू, बदाम यांसह एकूण १७.८२ टन साठा जप्त केला आहे.

६ आणि ७ नोव्हेंबरला राज्यभर विशेष मोहीम

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात अन्नपदार्थांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील विविध दुकाने आणि विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. खवा, मावा, सुका मेवा आणि पामतेलाच्या साठ्याचीही तपासणी करण्यात आली. (FDA Food Inspection)

पालघरमध्ये वाहनातून खवा आणि मिठाईचे बॉक्स जप्त

या विशेष मोहिमेदरम्यान पालघर जिल्ह्यात वाहतूक करणाऱ्या एका वाहनातून खवा आणि मिठाईचे बॉक्स जप्त करण्यात आले. याशिवाय मिठाई आणि सुकामेव्याबरोबरच पामतेलाचा साठाही प्रशासनाने ताब्यात घेतला. संशयास्पद खाद्यपदार्थांची तपासणी करून नियमानुसार पुढील कारवाई केली जात आहे. (Diwali Food Safety)

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष

दिवाळीत मिठाई, खवा, मावा आणि सुकामेव्यांची मागणी वाढते. अशा काळात भेसळयुक्त पदार्थ, कृत्रिम रंगांचा अयोग्य वापर आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यतेल यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे FDA कडून दुकानांमधील साठा, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि विक्रीसंबंधी नियमांचे पालन यांची तपासणी केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. ग्राहकांनी मिठाई किंवा सुका मेवा खरेदी करताना दर्जा, पॅकिंहग, उत्पादन आणि वापरण्याची अंतिम तारीख तपासण्याचे आवाहनही महत्त्वाचे ठरते. (Khoya Mawa Seized)

हेही वाचा : FDA New Rules : तुकाराम मुंढेंचा ई-कॉमर्स कंपन्यांना इशारा; कालबाह्य खाद्यपदार्थ विकल्यास कठोर कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts