Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Gokul Election Morcha : गोकुळचा मोर्चा कोल्हापुरात कशाला? संजय राऊत म्हणाले, थेट मंत्रालयावर धडक द्या!
राजकारण

Gokul Election Morcha : गोकुळचा मोर्चा कोल्हापुरात कशाला? संजय राऊत म्हणाले, थेट मंत्रालयावर धडक द्या!

Gokul Election Morcha
30
  • गोकुळसाठीचा मोर्चा कोल्हापुरापुरता मर्यादित न ठेवता थेट वर्षा बंगला, राजभवन आणि मंत्रालयावर धडक द्यायला हवी, असे संजय राऊत म्हणाले.
  • सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्यात आला.
  • संचालकांच्या संख्याबळावरून निर्माण झालेला अध्यक्षपदाचा पेच आणि सरकारी हस्तक्षेपाचा मुद्दा आंदोलनातून उपस्थित करण्यात आला.
Gokul Election Morcha : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात शेतकरी आणि दूध उत्पादकांचा महामोर्चा काढण्यात येत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आंदोलनाच्या ठिकाणाबाबत अधिक स्पष्ट आणि वेगळी भूमिका मांडली आहे. गोकुळचा प्रश्न केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित नसून त्यामध्ये राज्य सरकारच्या निर्णयाचाही संबंध आहे. त्यामुळे हा मोर्चा कोल्हापूर शहरात काढण्यासोबतच मंत्रालयावरही काढला पाहिजे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. (Satej Patil Protest Rally)

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून राज्य सरकारवर निशाणा

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. परंतु अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमध्ये कोरमचा प्रश्न sअमोर आला. त्यानंतर राज्य सरकारने पात्र सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर पाच सरकारी नामनिर्देशित सदस्य नियुक्त करण्यासंदर्भात अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे गोकुळमधील सत्तेचे गणित बदलण्याची शक्यतान निर्माणझाली आहे. या निर्णयाला समविचारी आघाडीने न्यायालयात आव्हान दिल्यामुळे गोकुळचा सत्तासंघर्ष आता केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. (State Government)

संजय राऊत यांचा मोर्चाबाबत वेगळा दृष्टिकोन

कोल्हापुरात निघालेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आंदोलनाच्या ठिकाणाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, गोकुळच्या प्रश्नात राज्य सरकारच्या अध्यादेशाची महत्त्वाची भूमिका असून, सरकारला जाब विचारायचा असेल, तर आंदोलनाची दिशा मंत्रालयाकडे असली पाहिजे.त्यामुळे कोल्हापुरातील मोर्चासोबतच राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मंत्रालयावर आंदोलन करण्याची भूमिका खासदार संजय राऊतांनी व्यक्त केली. (Sanjay Raut)

गोकुळचा प्रश्न आता राज्याच्या राजकारणात चर्चेत

गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. त्यामुळे संघाच्या सत्तासंघर्षाकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर दूध उत्पादकांच्या हिताच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. एकीकडे कोल्हापुरात महामोर्चाच्या माध्यमातून विरोधकांकडून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी हा लढा मंत्रालयापर्यंत नेण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे गोकुळचा वाद आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणखी चर्चेत राहण्याची शक्यता आहे. (Gokul Politics)

हेही वाचा :  Gokul Milk Union : गोकुळच्या सत्तासंघर्षात नवा ट्विस्ट! चार शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार; संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts