• Home
  • ताज्या बातम्या
  • मुलीशी लग्न करणं पडलं महागात; कोल्हापुरात २५ वर्षीय तरुणावर POCSOचा गुन्हा, नेमकं काय घडलं?
गुन्हा

मुलीशी लग्न करणं पडलं महागात; कोल्हापुरात २५ वर्षीय तरुणावर POCSOचा गुन्हा, नेमकं काय घडलं?

Kolhapur POCSO case
6

Kolhapur POCSO case: कोल्हापूरात अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक कारण्यात आली आहे. विवाहानंतर मुलगी गर्भवती झाल्याचे समोर आल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

कोल्हापूरात अल्पवीयन मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून २५ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात मुलगी गर्भवती झाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. राजारामपुरी पोलिसांनी आरोपीविरोधात POCSO आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली आहे.

हेही वाचा: LS मराठी Top 5 News, 12 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, सकाळच्या ताज्या घडामोडी; वाचा टॉप 5 हेडलाईन्स

तक्रारीनंतर प्रकरण समोर

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ टल्ली सुभाष पाटोळे (२५) याचा एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह झाला होता. विवाहाच्या वेळी संबंधित मुलीचे वय १६ वर्षे १६ दिवस असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.

विवाहानंतर दोघे पती- पत्नीप्रमाणे राहत होते. याच काळात मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पतीविरोधात गंभीर कलमांखाली कारवाई

तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याचा तसेच तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप असल्याने पोलिसांनी आरोपी आकाश पाटोळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

१० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर POCSO कायदा तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.

बालविवाहाविरोधात कायदा काय सांगतो?

भारतात मुलीच्या विवाहासाठी किमान वय १८ वर्षे आणि मुलाच्या विवाहासाठी किमान वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे १८ वर्षांखालील मुलीचा विवाह हा कायद्याने बालविवाहाच्या कक्षेत येतो.

अल्पवयीन मुलीशी विवाह करणे किंवा तिचे लग्न लावून देणे याबाबत संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध असल्यास POCSO कायद्याच्या तरतुदी लागू होऊ शकतात.

या घटनेमुळे कोल्हापुरात बालविवाहाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, अल्पवयीन मुलांचे विवाह रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts