Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 10वी-12वीच्या डेटशीटची प्रतीक्षा संपणार? ‘या’ कालावधीत होऊ शकते घोषणा
एजुकेशन- जॉब

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 10वी-12वीच्या डेटशीटची प्रतीक्षा संपणार? ‘या’ कालावधीत होऊ शकते घोषणा

CBSE Board Exam 2027
43
CBSE Board Exam 2027: १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आता परीक्षेच्या डेटशीटकडे लक्ष लागले आहे. CBSE कडून लवकरच परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या १० वी आणि १२ वीच्या २०२७ मधील बोर्ड परीक्षांकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. परीक्षेची तयारी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पातळीवर सुरू झाली असून, आता परीक्षेच्या तारखांचे संभाव्य वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची प्रतीक्षा आहे.

सीबीएसईकडून आगामी बोर्ड परीक्षांसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची List of Candidates (LOC) तयार करण्याची प्रक्रिया त्यापैकी एक आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांची माहिती संबंधित प्रक्रियेत नोंदवली जात असल्याने बोर्ड परीक्षेचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, २०२७ च्या डेटशीटबाबत CBSE कडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंचं आज उपोषण स्थगित; सरकारला 90 दिवसांची मुदत, कोणत्या 5 मागण्यांवर मिळाली हमी?

या तारखेला वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, CBSE कडून सुरुवातीला तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला हे वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. हे वेळापत्रक अंतिम नसू शकते. परिस्थितीनुसार बोर्डाकडून नंतर परीक्षांच्या तारखांमध्ये बदल किंवा सुधारणा केली जाऊ शकते.

मागील वर्षाच्या वेळापत्रकावरून काय दिसते?

2026 च्या बोर्ड परीक्षांसाठी CBSE ने प्रथम तात्पुरते वेळापत्रक 24 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर केले होते. त्यानंतर परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करत 30 ऑक्टोबर 2025 रोजी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

पुढे 30 डिसेंबर 2025 रोजी पुन्हा सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी काही परीक्षांच्या पुनर्नियोजनासंदर्भात सूचना देण्यात आली होती.

त्यामुळे मागील वर्षाचा अनुभव पाहता, यंदाही आधी संभाव्य वेळापत्रक आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार अंतिम किंवा सुधारित डेटशीट जाहीर होऊ शकते.

विद्यार्थ्यांसाठी Tentative Datesheet का महत्त्वाची?

बोर्ड परीक्षेच्या तारखा आधी समोर आल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाते. विशेषतः 12वीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षेसोबत विविध प्रवेश परीक्षांचीही तयारी करत असतात.

JEE Main चे पहिले सत्र साधारणपणे जानेवारीमध्ये आयोजित केले जाते. त्याचप्रमाणे वर्षाच्या सुरुवातीच्या काळात इतरही प्रवेश परीक्षा होतात.

बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तारखा जवळ आल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक प्रभावित होऊ शकते. त्यामुळे संभाव्य बोर्ड डेटशीट आधी उपलब्ध झाल्यास विद्यार्थी दोन्ही परीक्षांची तयारी अधिक व्यवस्थित पद्धतीने आखू शकतात. LS Marathi News Channel

विद्यार्थ्यांनी काय करावे?

2027 च्या बोर्ड परीक्षेची अधिकृत डेटशीट जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी अफवा किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनधिकृत वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये. CBSE कडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच परीक्षेच्या तारखांची खात्री करावी.

दरम्यान, डेटशीटची वाट पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर आणि नियमित सरावावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर त्यानुसार अभ्यासाचे अंतिम नियोजन करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts