Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • गणेशोत्सवात आरोग्यसेवेचा जागर; भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून ११ हजार चष्मे मोफत वाटप
Pune

गणेशोत्सवात आरोग्यसेवेचा जागर; भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून ११ हजार चष्मे मोफत वाटप

Pune News
39

पुणे । अमोल धर्माधिकारी, Pune Westin Beuro Head

Pune News: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून नागरिकांसाठी विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या (Bhausaheb Rangari Ganpati Trust) वतीने गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे (Pune Ganeshotsav 2026) आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांत नेत्र तपासणी, फिजिओथेरपी तसेच दंत उपचारांशी संबंधित तपासण्या करण्यात येणार असून गरजू नागरिकांना ११ हजार चष्म्यांचे मोफत (free eye checkup Pune) वाटप करण्यात येणार आहे.

या उपक्रमात विविध नामांकित रुग्णालये आणि संस्थांचा सहभाग आहे. अपोलो हॉस्पिटलच्या वतीने १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच अग्रवाल आय हॉस्पिटलतर्फे १७ ते २० सप्टेंबरदरम्यान नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. संचेती हॉस्पिटलच्या वतीने २१ सप्टेंबरला फिजिओथेरपी तपासणी करण्यात येणार आहे. त्याच दिवशी तसेच २२ सप्टेंबरला इंडियन प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी आणि डॉ. विजय माब्रुकर यांच्या सहकार्याने दंत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा: Gauri Avahan 2026: गौराई आली माहेराला…! आवाहनाचा शुभ मुहूर्त, नैवेद्य काय? विसर्जन कधी? जाणून घ्या A टू Z माहिती

शिबिर आयोजित

मॉडर्न कॉलेजच्यावतीने २२ सप्टेंबरला तर ढोले पाटील यांच्या सहकार्याने २३ सप्टेंबरला फिजिओथेरपी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या मंडपात होणार असून अधिकाधिक गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध तपासण्यांमुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेता येणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही मिळणार आहे.

धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा उत्सव

“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा उत्सव व्हावा, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. याच उद्देशाने यंदा विविध नामांकित रुग्णालये व संस्थांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक उपचाराबाबत सल्ला मिळणार आहे. विशेषतः गरजू नागरिकांना ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने हा आरोग्योत्सव होत असून ट्रस्टचे हे सेवाकार्य यापुढेही असेच सुरू राहील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts