Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत नवा पेच! एकनाथ शिंदेंचा सचिन सानप यांना पाठिंबा, भाजपची चिंता वाढणार?
राजकारण

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत नवा पेच! एकनाथ शिंदेंचा सचिन सानप यांना पाठिंबा, भाजपची चिंता वाढणार?

Pune Teachers Constituency Election
5
Pune Teachers Constituency Election: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील राजकीय समीकरणे चर्चेत आली आहेत. एकनाथ शिंदे यांनी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केल्याने भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Teachers Constituency Election: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील राजकीय समीकरणे चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणुका एकत्र लढण्याची भूमिका मांडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुणे शिक्षक (Pune Election 2026) मतदारसंघाबाबत स्वतंत्र भूमिका स्पष्ट केली आहे या मतदारसंघात शिवसेनेने (Shiv Sena Support) अपक्ष उमेदवार सचिन सानप (Sachin Sanap) यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे (Kaustubh Gawde) यांच्यासमोरील राजकीय आव्हानाची चर्चा सुरू झाली आहे. (Pune Latest News)

हेही वाचा: जंतरमंतरवरील अटकेचे मुंबईत पडसाद! आझाद मैदानात आज CJPचे ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलन

पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदेची वेगळी रणनीती?

पुणे शिक्षक मतदारसंघातून (Pune Teachers Election) भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतील जागावाटपानंतर शिवसेनेचे नेते मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मात्र, आता शिवसेनेने सचिन सानप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.

सचिन सानप यांनी यापूर्वी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी ( ओएसडी ) म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला शिवेसनेकडून मिळालेल्या पाठिंब्याला राजकीय (Mahayuti Alliance) महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

महायुतीच्या एकत्रित निवडणूक लढवण्याच्या भूमिकेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी काही मतदारसंघांमध्ये अपवाद असल्याचे स्पष्ट केले. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी सचिन सानप यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

महायुतीच्या पाचही जागा जिंकण्याचा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. मात्र, पुण्यातील पाठिंब्याच्या निर्णयामुळे मित्रपक्षांमधील समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अमरावतीतील राजकीय संघर्षाचे पुण्यात पडसाद?

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर भाजपचे बंडखोर दिलीप कडू निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर राजकीय संघर्ष निर्माण झाल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे शिक्षक मतदारसंघातील शिवसेनेच्या भूमिकेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

महायुतीसमोर समन्वयाचे आव्हान

विधान परिषद निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे लढण्याची भूमिका मांडली असली, तरी काही मतदारसंघांमध्ये उमेदवारी आणि पाठिंब्यावरून वेगवेगळी समीकरणे तयार होत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचा पाठिंबा मिळालेले सचिन सानप यांच्यातील लढतीकडे त्यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अमरावतीतील बंडखोरी, पुण्यातील पाठिंब्याचा निर्णय आणि इतर मतदारसंघातील संभाव्य मैत्रीपूर्ण लढती यांमुळे महायुतीसमोरील समन्वयाचे आव्हाने वाढू शकते. या घडामोडींचा निवडणुकीच्या निकालावर किती परिमाण होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts