Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • तिकीट नाही मिळालं तरी माघार नाही; श्रीकांत देशपांडेंची अमरावतीत स्वतंत्र लढाईची तयारी
महाराष्ट्र

तिकीट नाही मिळालं तरी माघार नाही; श्रीकांत देशपांडेंची अमरावतीत स्वतंत्र लढाईची तयारी

Amravati Teachers Election 2026
19
Amravati Teachers Election 2026: श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत स्वतंत्र लढतीचे संकेत दिले आहेत. जाणून घ्या संपूर्ण राजकीय घडामोडी.

Amravati Teachers Election 2026: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा (Amravati Teachers Election 2026) होण्याआधीच शिंदेसेनेचे नेते आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत नाराजी समोर आली आहे.

देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी एक अर्ज पक्षाच्या उमेदवारीसाठी, तर दुसरा अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुकीच्या मैदानातून (Amravati MLC Election) माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. ‘शिक्षक आघाडी’च्या माध्यमातून निवडणूक (Amravati Teachers Constituency) लढवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: PPF, SSY, NSCचे व्याजदर ‘जैसे थे’! ऑक्टोबर-डिसेंबरसाठी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन दर

देशपांडे नेमकं काय म्हणाले?

अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देशपांडे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा दाखला दिला. आपण १९९२ पासून शिवसेनेत कार्यरत असून सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी पक्षाच्या उमेदवारीवर आपला दावा असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.

पक्षाने उमेदवारी दिली नाही, तरी निवडणुकीतून माघार घेण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी मिळणे हा आपला अधिकार असल्याचे नमूद करत, तिकीट न मिळाल्यास ‘शिक्षक आघाडी’च्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार (Maharashtra MLC Election 2026) असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विविध उपक्रमांवरही देशपांडे यांनी टीका

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांवरही देशपांडे यांनी टीका केली. मोफत साड्यांसह इतर वस्तूंच्या वाटपाचा उल्लेख करत शिक्षक मतदार अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. शिक्षक मतदार सुज्ञ असून यावेळी प्रत्येक बाबीचा विचार करून मतदान करतील, असेही ते म्हणाले.

देशपांडे यांच्या या भूमिकेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या घोषणेपूर्वीच अमरावती शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणे चर्चेत आली आहेत. पक्षाकडून कोणाला संधी दिली जाते आणि त्यानंतर देशपांडे आपली भूमिका कायम ठेवतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत

याचदरम्यान महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर असोसिएशन अर्थात मेस्टानेही अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवला आहे. संघटनेच्या वतीने किरण चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गेल्या दोन दशकांपासून विनाअनुदानित शाळांमधील तसेच इंग्लिश स्कूलमधील शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर काम करत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. शिक्षकांच्या मागण्या अनेकदा शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न थेट विधानपरिषदेपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचा अधिकृत उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच दोन स्वतंत्र दावेदार मैदानात उतरल्याने अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची रंगत वाढली आहे. आगामी काळात आणखी कोणते उमेदवार रिंगणात उतरतात आणि विविध संघटनांची भूमिका काय राहते, यावर निवडणुकीचे पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts