Small Savings Interest Rates: PPF, सुकन्या समृद्धी योजना आणि NSCमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी सरकारने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे या योजनांवरील मागील तिमाहीचेच व्याजदर कायम राहणार आहेत.
Small Savings Scheme Interest Rate: PPF, सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Interest Rate ) आणि NSC मध्ये पैसे गुंतवणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तिमाहीसाठी (Small Savings Scheme) अल्पबचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे मागील तिमाहीत लागू असलेले दर पुढील तीन महिन्यांसाठीही (PPF October December 2026) कायम राहणार आहेत.
वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील (SSY Interest Rate 2026) अधिसूचना जारी केली. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विविध सरकारी अल्पबचत योजनांवर (NSC Interest Rate) पूर्वीप्रमाणेच व्याजदर लागू राहतील.
हेही वाचा: पुण्यातील टॉप 5 दुर्गापूजा; बंगाली पद्धतीचा उत्सव अनुभवायचा असेल तर ‘ही’ ठिकाणं नक्की गाठा!
PPF वर 7.1 टक्के व्याज कायम
दीर्घकालीन बचतीसाठी लोकप्रिय असलेल्या पब्लिक Provident Fund ( PPF) वरील व्याजदर 7.1 टक्के वार्षिक इतकाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे PPF मध्ये नियमित गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना या तिमाहीतही याच दरानुसार व्याज मिळणार आहे.
सुकन्या समृद्धी योजनेवर किती व्याज?
मुलीच्या भविष्यासाठी बचत करणाऱ्या पालकांसाठी Sukanya Samriddhi Account Scheme महत्त्वाची योजना आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर 8.2 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
NSCचा व्याजदरही बदललेला नाही
National Savings Certificate (NSC) मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही दिलासा कायम आहे. NSCवरील व्याजदर 7.7 टक्के इतकाच राहणार आहे. सुरक्षित आणि सरकारी पाठबळ असलेल्या बचत पर्यायांकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे.
इतर अल्पबचत योजनांचे काय?
PPF, SSY आणि NSCव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनांचे दरही या तिमाहीसाठी बदललेले नाहीत. अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा सरकारकडून दर तिमाहीला आढावा घेतला जातो आणि त्यानंतर पुढील तिमाहीसाठी दर निश्चित केले जातात.
याचा अर्थ 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2026 या तीन महिन्यांत या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या किंवा आधीपासून गुंतवणूक असलेल्या ग्राहकांसाठी लागू व्याजदरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ काय?
व्याजदरात बदल न झाल्यामुळे सध्याच्या दरांवरच बचत आणि आर्थिक नियोजन सुरू ठेवता येणार आहे. विशेषतः PPF किंवा सुकन्या समृद्धी योजनेत दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी नियमित गुंतवणूक करणाऱ्यांना या तिमाहीत दर बदलाची चिंता राहणार नाही.
मात्र कोणतीही बचत योजना निवडण्यापूर्वी तिचा कालावधी, करनियम, पैसे काढण्याच्या अटी आणि तुमची आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.




