एजुकेशन- जॉब

परदेशातून मेडिकल पदवी घेतलीय? FMGE 2026 ची तारीख जाहीर, असा करा अर्ज

FMGE 2026
39
FMGE 2026: परदेशातून वैद्यकीय पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. आता FMGE 2026 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर जाणून घेऊयात अर्ज कसा करता येईल.

NBEMS FMGE ऑक्टोबर २०२६ सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. परदेशातून वैद्यकीय पदवी घेतलेल्या पात्र भारतीय नागरिकांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली स्क्रीनिंग टेस्ट या परीक्षेद्वारे देता येणार आहे.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) कडून FMGE ऑक्टोबर 2026 सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया (FMGE October 2026) आजपासून सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतील. या परीक्षेद्वारे परदेशातून वैद्यकीय पदवी घेतलेली पात्र भारतीय नागरिक आणि ओव्हरसीज इंडियन सिटीझन ( OCI) भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली स्क्रीनिंग टेस्ट देऊ शकतात.

हेही वाचा: मुंबई आंदोलनासाठी जरांगे पाटील ठाम; हायकोर्टाने स्पष्ट केली भूमिका, सरकारलाही दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

NBEMS ने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून 25 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. FMGE ऑक्टोबर 2026 सत्राची परीक्षा 31 ऑक्टोबर 2026 रोजी संगणकाधारित परीक्षा (Computer Based Test) पद्धतीने देशभरातील निर्धारित परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.

FMGE 2026 साठी महत्त्वाच्या तारखा

National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS) कडून FMGE ऑक्टोबर २०२६ सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता सुरू झाली असून उमेदवारांना २५ सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी https://nbe.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवर माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि इतर नियमांची माहिती त्यामध्ये देण्यात येणार आहे.

31 ऑक्टोबरला होणार FMGE परीक्षा

FMGE ऑक्टोबर 2026 सत्राची परीक्षा 31 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षा देशभरातील निश्चित परीक्षा केंद्रांवर Computer Based Test (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेचा निकाल 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

परीक्षेत 300 MCQ प्रश्न

FMGE परीक्षेत एकूण 300 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. परीक्षा संगणकावर घेतली जाईल आणि प्रश्नपत्रिका केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध असेल.

प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातील. उमेदवाराला त्यापैकी योग्य पर्याय निवडावा लागेल. परीक्षेदरम्यान एखादा प्रश्न नंतर सोडवायचा असल्यास तो Review साठी मार्क करता येईल. त्यामुळे उर्वरित वेळेत उमेदवार त्या प्रश्नाकडे पुन्हा पाहू शकतो.

अर्जासाठी किती शुल्क भरावे लागेल?

FMGE ऑक्टोबर 2026 सत्रासाठी परीक्षा शुल्क 5,250 रुपये निश्चित करण्यात आले आहे. यावर 945 रुपये GST आकारला जाणार आहे.

त्यामुळे उमेदवाराला अर्जासाठी एकूण 6,195 रुपये शुल्क भरावे लागेल.

FMGE 2026 अर्ज कसा भरायचा? (FMGE registration 2026)

FMGE ऑक्टोबर 2026 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी:

NBEMS च्या https://nbe.edu.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
FMGE October 2026 या परीक्षेची लिंक निवडावी.
ऑनलाइन पोर्टलवर नवीन नोंदणी करावी.
लॉगिन करून अर्जातील आवश्यक माहिती भरावी.
मागितलेली कागदपत्रे आणि आवश्यक तपशील अपलोड करावेत.
निर्धारित परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे.
अर्ज अंतिम स्वरूपात सबमिट करावा.
अर्ज सबमिट केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून भविष्यासाठी जतन करावे.

एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास काय होईल?

FMGE 2026 साठी उमेदवारांनी एकच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. चुकून किंवा जाणूनबुजून एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास NBEMS कडून उच्च Application Number असलेल्या अर्जाचा विचार केला जाऊ शकतो.

इतर अर्ज रद्द होण्याची शक्यता असून अशा प्रकरणांमध्ये भरलेले परीक्षा शुल्कही जप्त केले जाऊ शकते. त्यामुळे अर्ज भरताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक तपासूनच अंतिम सबमिशन करावे.

FMGE 2026: महत्त्वाच्या तारखा एकाच नजरेत

अर्ज प्रक्रिया सुरू: 11 सप्टेंबर 2026, सायंकाळी 5 वाजता
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 सप्टेंबर 2026
FMGE परीक्षा: 31 ऑक्टोबर 2026
निकाल: 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत अपेक्षित
परीक्षा पद्धत: Computer Based Test
एकूण प्रश्न: 300 MCQs
प्रश्नांची भाषा: इंग्रजी
एकूण परीक्षा शुल्क: 6,195 रुपये

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts