Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • विहिरीतील पाणबुडी मोटारींवर डल्ला; म्हसवड पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या, ३ मोटारींसह १.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हा

विहिरीतील पाणबुडी मोटारींवर डल्ला; म्हसवड पोलिसांनी टोळीला ठोकल्या बेड्या, ३ मोटारींसह १.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara Crime News
7

सातारा । प्रशांत जगताप, प्रतिनिधी

Satara Crime News: सातारा | १७ सप्टेंबर : शेतातील विहिरी आणि सार्वजनिक विहिरींमधील पाणबुडी मोटारी चोरणाऱ्या टोळीचा म्हसवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या तीन पाणबुडी मोटारींसह तब्बल १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या तपासातून मोटार चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

कुकूडवाड (ता. माण) येथील चाहुर शिवारातील सार्वजनिक विहिरीतून सम्राट कंपनीची पाणबुडी मोटार चोरीला गेल्यानंतर याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला.

हेही वाचा: ‘एकच वादा, अजित दादा’नंतर आता ‘आपल्या वहिनी आहेत ना!’; सुनेत्रा पवारांच्या रिलाँचिंगची तयारी?

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला.

तपासादरम्यान अखिल विलास जाधव, आदित्य तानाजी पुकळे आणि वैष्णव विकास कोळी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर मोटार चोरीची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीची एक पाणबुडी मोटार तसेच अन्य दोन चोरीच्या मोटारी पोलिसांनी हस्तगत केल्या. तपास पुढे सुरू असताना मोटार चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले.

या कारवाईमुळे परिसरातील मोटार चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस करीत आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts